Monsoon Tourism : पावसाचे प्रमाण वाढल्याने सुटीच्या दिवशी धरण, गड-किल्ल्यावर पर्यटनाला गर्दी करणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत. हवामान विभागाच्या सूचना पाहूनच घरातून बाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Monsoon Tourism Precautionary instructions to tourists from administration nashik)
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २३ धरणे असून, गड, किल्ले, धरण आणि धबधब्यावर पावसाळी पर्यटनाला गर्दी होऊ लागली आहे. हरिहर किल्ला, दुगारवाडी धबधबा, पहिने, इतर गड-किल्ले, धरण, तलाव परिसर अशा धोकादायक आपत्तीप्रवण क्षेत्रात सूचना फलक लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या.
वन विभागाच्या पर्यटन ठिकाणांवर शनिवार व रविवार तसेच त्यांना जोडून येणाऱ्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी अतिरिक्त गार्ड नेमण्यात यावे, पोलिस विभागाने इतर विभागांशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना दिल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शनिवार व रविवार (वीकेंड) तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नाशिक जिल्ह्याबाहेरील पर्यटक निवासासाठी गड-किल्ले, धरण परिसर आदी ठिकाणी गर्दी करतात. विशेषतः सुटीच्या दिवशी जास्त लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
हवामान विभागाने ज्या दिवशी नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट अथवा रेड अलर्ट घोषित असेल, त्या दिवशी पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे. नागरिकांनी मोसम, सचेत, दामिनी यांसारखे अॅप्स डाउनलोड करून हवामानविषयक माहिती घेऊनच सहल व पर्यटनाचे नियोजन करावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.