Nashik News : बागलाण तालुक्यातील मोसम व आरम या दोन्ही नद्यांवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २५ गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यावरील स्थगिती उठविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. (Moratorium on cement concrete dam lifted Information of MLA Dilip Borse Nashik News)
महाविकास आघाडी सरकारने स्थगिती आणल्यामुळे प्रस्तावित बंधाऱ्यांचे कामे लालफितीत अडकले होते. मात्र याबाबत लवकरच शासन निर्णय होणार असून यामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येतानाच परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाईही दूर होण्यास मदत होईल, अशी माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.
श्री. बोरसे म्हणाले, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे बागलाण तालुक्यात ठिकठिकाणी गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारे होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
या प्रस्तावांना जलसंधारण विभागाकडून प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. परंतु महाविकास आघाडी शासनाने स्थगिती आणल्यामुळे प्रस्तावित बंधाऱ्यांचे कामे लालफितीत अडकले होते. राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे सरकार आल्याने स्थगिती उठविण्याबाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्थगिती उठविण्याबाबत तत्त्वतः मान्यता दिली आहे. लवकरच याबाबत शासन आदेश काढण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
तालुक्यात ठिकठिकाणी होणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे शेकडो क्षेत्रावरील शेती सिंचनाची सोय होणार आहे. सोबतच या परिसरातील पाणी टंचाई टाळण्यासही हातभार लागेल. साळवण : १, साल्हेर : ४, अंतापूर : २, मानूर : ४, चौंधाणे : १, अंबासन : २, कंधाणे : १, मोराणे सांडस : १, भडाणे : २, सोमपूर, जायखेडा : १, खमताणे : १, वाठोडे (पिठवळ्या आंबा) : १, वाठोडे (मोल्या पहाड) : १, वाठोडे (भिलकसाड) : १, वाठोडे (जोगदरा): १, वाठोडे (साळवण) : १ याप्रमाणे होणाऱ्या एकूण २५ बंधाऱ्यांच्या कामासाठी २३ कोटी ९० लाख ४९२ रुपये निधीदेखील मंजूर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.