Nashik News : मुख्याध्यापकांचे वेतन थांबविण्यास स्थगिती; ZP माध्यामिक शिक्षणाधिकारी यांचा U- Turn

ZP Nashik news
ZP Nashik newsesakal
Updated on

नाशिक : टोकडे (ता. मालेगाव) येथील सत्यवती कौर विद्यालयातील मुख्याध्यापकांना तिसरे अपत्य असल्याने त्यांच्यावर वेतन थांबविण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, लागलीच त्यांनी या कारवाईला स्थगिती देत असल्याचा आदेश काढत यु-टर्न घेतला आहे. (moratorium on withholding principals salaries U Turn of ZP Secondary Education Officer Nashik News)

संबंधीत मुख्याध्यापक सुनील धोंडू फरस यांना लहान कुटूंब कायदा २००५ची अंमलबजावणी झाल्यानंतर शिक्षण सेवक म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांनी शासन नियमाचे भंग करीत तिसरे अपत्य जन्माला घातल्याने नियमानुसार त्यांना बडतर्फ करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक व वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती.

या गंभीर प्रकाराबाबत वेळोवेळी स्मरणपत्राद्वारे लक्षही वेधले. तरीही दाद देत नसल्याने द्यानद्यान यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात चुप बैठो आंदोलन केले होते. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी वेतन थांबविण्याची कारवाई केली होती.

आता त्यांनीच अचानक यु-टर्न घेत या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात शिक्षणाधिकारी कारवाई का करत नाहीत किंवा या प्रकारात काही आर्थिक व्यवहार झाला आहे काय? अशा चर्चा जि. प. वर्तुळात आहे. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापक हे संस्थेच्या अध्यक्षांचे जावई असल्याने आपसातील हितसंबंध जपत बडतर्फीची कारवाई केली नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

ZP Nashik news
Nashik News: नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे; पावसाचे पाणी रस्ते, शेतीमध्ये साठण्याचे प्रमाण वाढले

"शिक्षण अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद गंभीर बाबीची चौकशी करावी. दोषी मुख्याध्यापकांचे बेकायदेशीर देत असलेले वेतन तत्काळ थांबवून मान्यता रद्द करावी. अन्यथा येत्या १२ एप्रिलपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव यांना मेलद्वारे कळविले आहे."

-विठोबा द्यानद्यान, सामाजिक कार्यकर्ते

"उपसंचालकांनी याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संस्थेला पत्र लिहून संबंधित मुख्याध्यापकाला बडतर्फ करण्याची सूचना केली होती. संस्थेने यात काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे आता त्यांची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्या वेतन कपातीच्या पत्राला तुर्त स्थगिती देण्यात आलेली आहे."

-प्रविण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

ZP Nashik news
Ramazan Festival : QR कोड प्रणालीतून जकात दान; जकात देणाऱ्यांची माहिती गुप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()