Nashik: दिंडोरी पेठमधील कामांवरील स्थगिती उठविली! 173 कोटींच्या विकासकामांना झिरवाळांच्या प्रयत्नांनी मंजुरी

Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal
Updated on

Nashik News : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रस्तावित कामांची स्थगिती अखेर अजित पवार उपमुख्यमंत्री होताच उठली आहे.

काही नव्याने विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळवीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पाठपुराव्याने मतदार संघातील १७३ कोटींच्या विकासकामांना सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

यापूर्वी मंजूर असलेल्या मात्र निधीअभावी रखडलेल्या कामांना निधीची तरतूद तसेच नवीन ही प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. (Moratorium on works in Dindori Peth lifted Development works worth 173 crores approved due to efforts of narhari Zirwal Nashik)

महाविकास आघाडी सरकार काळात श्री. झिरवाळ यांनी पाठपुरावा करत विविध रस्ते, पूल आदी विकासकामे प्रस्तावित केले, परंतु सरकार बदल होताच बहुतांश कामांना स्थगिती देण्यात आली होती.

टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन सुरू झालेल्या कामांनाही निधी तरतूद न झाल्याने अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत प्रलंबित होती. श्री. झिरवाळ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.

गेल्या पंधरवड्यात राजकीय घडामोडी होत अजित पवार यांच्यासह एक गट सरकारमध्ये सामील होत अजित पवार मुख्यमंत्री झाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्तावित कामांची स्थगिती उठवणे, प्रलंबित कामांना निधी उपलब्धता व नव्याने विकासकामे होण्यासाठी, रद्द झालेल्या वळण योजना होण्यासाठी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 36.40 कोटींच्या चिमणपाडा वळण योजनेच्या कामास मान्यता देण्यात आली होती. त्यापाठोपाठ दिंडोरी व पेठ तालुक्यातील सुमारे 173 कोटींच्या विविध रस्ते, पूल आदी विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Narhari Zirwal
Nashik News: पुण्याच्या धर्तीवर मनपाची सुरक्षा द्यावी किन्नरांच्या हाती! किन्नर बांधवांच्या अपेक्षा

चिमणपाडा वळण योजना मंजूर

दिंडोरी- पेठ- सुरगाणा तालुक्याचे घाटमाथ्यावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या मांजरपाडासह बारा वळण योजनांचा पाठपुरावा नरहरी झिरवाळ यांनी केला होता.

त्यातील मांजरपाडा व इतर सात योजना पूर्ण झाल्या, पाच योजना रद्द झाल्या होत्या, त्या पुन्हा सुरू करण्याचा झिरवाळ यांचा पाठपुरावा सुरू होता. अजित पवार सरकारमध्ये सामील होताच पहिल्याच बैठकीत चिमणपाडा वळण योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

योजनेसाठी 36.40 कोटीची निधी तरतूद करण्यात आली आहे. चिमणपाडा परिसरात पडणारे पावसाचे पाणी आता अडविले जाणार आहे.

दोन्ही नाल्यांवर बांध घालत ते पाणी पूर्वेला वळवले जाऊन गोदावरी खोऱ्यातील कादवा नदीद्वारे करंजवण धरणात येणार आहे. सुमारे 45 दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी या योजनेमुळे मिळणार आहे.

दर्जा उन्नतीकरणास निधी मंजूर

दिंडोरी व पिंपळगाव बाजार समितीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दिंडोरी- पालखेड- जोपूळ पिंपळगाव हा जिल्हा मार्ग होता. त्याचा दर्जा उन्नत करत तो रस्ता राज्य मार्ग 29 झाला असून या रस्त्याचे मजबुतीकरण, नूतनीकरणासाठी सुमारे 17 कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

तूर्तास खड्डे भरत डागडुजी करत पावसाळा संपताच काम सुरू होणार आहे. पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे झाली, मात्र त्यातील काही रस्ते खराब झाले आहेत या रस्त्यांची पावसाळा संपताच दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Narhari Zirwal
Nashik Water Crisis: गतवर्षी ओव्हरफ्लो, यंदा अत्यल्प साठा; पालखेड 35 टक्के, तिसगाव कोरडेठाकच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.