Nashik News: दरेगावच्या रणरागिणींचा एल्गार! गावात मद्यप्राशन करुन आल्यास 5 हजाराचा दंड अन् चोपही मिळणार

women power
women poweresakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : आद्यशक्तीपीठ सप्तशृंगी गड व ऐैतिहासिक अहिवंत किल्याच्या पायथ्याशी असलेले, खवा निमिर्तीचे प्रसिध्द म्हणून सुपरिचीत असलेल्या दरेगाव वणी येथील रणरागीनींनी अवैध दारु विक्री व गावात दारुबंदीचा एल्गार केला आहे.

गावात दारू पिऊन आल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला असून त्याची कडक अंमलबजावणी महिनांनी सुरु केली आहे. (morcha of womens of Daregaon If you drink alcohol in village you will get fine of 5 thousand and beating Nashik News)

दिंडोरी व कळवण तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले निसर्गसौदर्याने नटलेले वणी- नांदुरी रस्त्यावर असलेले सुमारे आठशे लोकसंख्येचे शंभर टक्के आदिवासी गांव, शेती व शेतीपुरक पशुपालन करुन दुग्ध व्यवसाय बरोबरच शेतमजुरी हे उदर्निवाहाचे मुख्य साधन, दुग्धव्यवसायतून खवा निर्मितीचे प्रसिध्द ठिकाणा बरोबरच समुद्रसपाटी पासून ४५६९ फूट उंचीवरआदिमाया सप्तशृंग गडाच्या मंदीर शिखरावर वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज फडकविण्याचा मान शेकडो वर्षांपासून परंपरेनूसार दरेगांव येथील गवळी - पाटील कुटुंब वारसाने चालू आहे.

अशा दरेगाव (वणी) या गावास काही वर्षांपासून अवैध मद्यविक्री व तरुणाई मध्ये वाढती व्यसनाधिनता यामूळे गावात अशांतता पसरु लागल्या बरोबरच गावात दारूने अनेक कुटुंब उद्धस्त होवू लागले. अनेक विवाहिता विधवा होण्याच्या घटना घडल्या.

तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याने कुटुंबे रस्त्यावर येवू लागल्याने दरेगावातील सुमारे अडीचशे रणरागीनींनी एकत्र येत संसार वाचविण्यासाठी या रणरागिणींनी दुर्गावतार धारण गावात अवैध दारु विक्री व गावात दारुबंदीचा एल्गार केला आहे.

गावात दारू पिऊन आल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला. बायको-मुलांना मारझोड केल्यास १० हजार रुपयांचा दंड करण्याचाही निर्णय गावातील पंच मंडळीच्या उपस्थित घेतला.

गावात मद्यपान करुन कोणी आले तर दंडात्मक कारवाई पंचमंडळीने करावी व ही रक्कम गावच्या समस्या सोडविण्यासाठी व विकासकामांसाठी वापरावी असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

women power
Covid Case Rise : येवल्यात एकाचवेळी 4 कोरोनाबाधित; जिल्ह्यातील 48 जणांची तपासणी

गावात घेण्यात आलेल्या महिला वर्गाच्या बैठकीत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयास गांवकन्यांनी एकजुटीने या रणरागीणींच्या भूमिकेचे व निर्णयाचे स्वागत केले पांठिबा दिला आहे. गावात दारू पिऊन येणाऱ्यास गावातच चोप देण्याचाही निर्णयही घेण्यात आला.

याची अंमलबजावणी म्हणून गाव पंचांनी गावात दवंडी देत त्याची माहिती देत, गावात यापुढे दारु विकणार नाही किंवा पिऊन येणार नाही असा ठराव करण्यात आला. यासाठी तंटामुक्ती कमिटीचा ठराव करत उपस्थितांच्या सह्या घेण्यात आला.

यावेळी कलावती गायकवाड, विमल राऊत, लक्ष्मी बहिरम, सावित्री कुवर, रेखा गवळी, सोनी चव्हाण, कलावती जाधव, शोभा गवळी, सिंधुबाई गवळी, राधाबाई बहिरम, लक्ष्मीबाई दळवी, गंगूबाई महाले, प्रभावती भोये, फुलाबाई भोये, अनिता गांगुर्डे, मोहना बहिरम, काळीबाई जोपळे, वंदना बहिरम, कलीबाई गायकवाड, सुमन ठाकरे, संगीता बहिरम, पुंडलीक गवळी, नामदेव बाहिरम, रामदास चव्हाण, मन्साराम गवळी, मोहन ठाकरे, हिरामण ठाकरे, दशरथ बाहिरम, यशवंत बहिरम, सुदाम चव्हाण, सुरेश गायकवाड, संजय गायकवाड, सोमनाथ गवळी आदी उपस्थित होते.

दरम्यान रणरागिंनीनी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने स्व:ताच गावालगतच्या जगंलातील अवैध मद्य निमिर्तीचा अड्डा महिलांनी शोधून महिलांनी अवैध मद्य निर्मितीचा हा अड्डाही उध्वस्त केला आहे.

"गावात दारूबंदी करण्याचा निर्णय होऊन तटामुक्त समिती, सरपंच व पंच कमिटी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याची दवंडी देण्यात आली असून दारू पिऊन गावात आले, तर पाच हजार रुपयांचा दंड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला."

- धनराज राऊत, अध्यक्ष, तंटामुक्त समिती दरेगाव

women power
Nashik News : द्राक्षविक्री अन मुलामुलीचे लग्न सारखेच! डॉ. शेखर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()