विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : राज्यातील मुलांना सकस आणि पोषक आहार देऊन त्यांच्या प्रकृतीत आणि बौद्धिक क्षमतेत सुधारणा होण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात पौष्टिक आठवड्यातून किमान एक दिवस फळे, सोया बिस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे अशा स्वरुपात पूरक आहार देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले. (More supplements will be included in school nutrition nashik news)
राज्यात सद्यःस्थितीत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांमधून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
तसेच अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत.
गोसावी यांनी जिल्हा परिषदांचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे त्याबाबतचे निर्देश दिले. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत आहे. राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत.
त्यानुसार या योजनेंतर्गत आता नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोया बिस्कीट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे अशा स्वरुपात पूरक आहार देण्याबाबत पुन्हा एकदा सर्व शाळा आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना सूचना देण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
"ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत लाखोंच्या संख्येने गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अशा मुलांना आहारात हवे तेवढे प्रोटीन व इतर घटक परिस्थितीमुळे नियमित मिळत नसल्याने या निर्णयाचा खरा फायदा या लाखो गोरगरीब लहान मुलांना होणार आहे."-कृष्णाजी भगत, संचालक मविप्र
"शालेय पोषण आहारात बेदाणे देण्याबाबत देखील निर्णय झाल्याने याचा फायदा हजारो बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या द्राक्षाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी बेदाणे प्रक्रिया उद्योग सुरु केला. मात्र बेदाण्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. आता पोषण आहारात त्याचा समावेश केल्याने बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा मिळेल" -अण्णासाहेब गडाख, अध्यक्ष माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर
"शासनाच्या या निर्णयामुळे मुलांचा शाररिक आणि बौद्धिक विकास झपाट्याने होण्यास मदत मिळणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील मुलांचा शाळेकडे ओढा वाढण्यासही मदत होणार आहे. मुलांना विविध प्रोटीन मिळाल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होऊन गुणवत्ता वाढीमध्ये त्यास अधिक लाभ होईल" -राजेश डामसे, गटशिक्षणाधिकारी सिन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.