Nashik News : 'या' महामार्गावर प्रवासापासून रोखले 4500 पेक्षा जास्त वाहनांना!

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamargesakal
Updated on

Nashik News : शिर्डी ते भरवीर असा ८० किलोमीटर महामार्गावरील एन्ट्री व एक्झिट पॉइंटवर नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग वायुवेग पथक वाहन तपासणीकामी नेमण्यात आले आहे.

प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने दिवस-रात्र थांबत कारवाई केली आहे. (More than 4500 vehicles prevented from traveling on samruddhi mahamarg nashik news)

समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी, तसेच वाहन तपासणी व चालकांचे समुपदेशन करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अपघात रोखण्यासाठी सुमारे साडेचार हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांचे समुपदेशक करण्यात आले.

सुमारे साडेचार हजार वाहनांना प्रवेश नाकारला. काही प्रमाणात धोकादायक असल्याने, निश्चितपणे अपघाताला कारणीभूत ठरणारी होती. त्यामुळे या वाहनांना प्रवेश नाकारत एक प्रकारे होणाऱ्या संभाव्य अपघातांना आळा बसला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg Accident Video : 'समृद्धी'वर अपघातांचं सत्र थांबेना; टायर फुटून ट्रकला भीषण आग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने उपाययोजना करत वाहनाचे टायर, वाहनाची योग्यता समाधानकारक नसणे, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अतिवेग आदी प्रकरणी कारवाई करीत २६ मे ते ३१ जुलै या दोन महिन्यांत साडेचार हजारांपेक्षा जास्त वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारले. २९९ वाहनचालकांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Samruddhi Mahamarg
Nana Patole News : राहुल गांधींवरील फ्लाइंग किसचा आरोप हा..... नाना पटोलेंची भाजपावर टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.