Measles Infection : मालेगाव येथे पन्नासवर बालकांना गोवरची लागण

Measles Infection
Measles Infectionesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : जगभरातून हद्दपार झालेल्या पल्स पोलिओ लसीकरणासह अन्य लसीकरणाबाबत शहरातील पूर्व भागात असलेल्या अनास्थेमुळे विविध साथरोग सातत्याने उद्‌भवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथे डोके वर काढलेल्या गोवरची साथ शहरात आढळून आली आहे. (more than 50 children infected with Measles in Malegaon Nashik news)

Measles Infection
Nashik Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 6 महिने शिक्षा

महापालिकेसह विविध रुग्णालयांत पन्नासपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी गोवरचे रुग्ण असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यातील बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात गोवरचे रुग्ण आढळून आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे रुग्ण दिसून येताच महापालिका आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागात पाहणी व तपासणी करण्यात येत आहे.

तपासणीदरम्यान गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे. परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. आरोग्य विभागाने आवश्‍यक ती पावले उचलली असून, रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तथापि, पालक व रुग्णांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी बालकांना विविध प्रकारच्या साथरोगांचे लसीकरण करून घेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.

Measles Infection
Nashik Crime : बेशिस्त वाहनचालकांमुळे गेला दोघांचा बळी; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.