Nashik News: वारकऱ्यांनी घेतला रावळगाव पुरणपोळीचा स्वाद; चंद्रभागेच्या तीरावर महिला पुरुषांनी केली अन्नसेवा

The mothers and sisters of Rawalgaon who are making Puranpoli with hard work
The mothers and sisters of Rawalgaon who are making Puranpoli with hard workाेोकोत
Updated on

Nashik News : पंढरपूर येथे रामभाऊ महाराज लबडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रभागेच्या तीरी झालेल्या कार्यक्रमातील अखेरच्या दिवसाच्या संत पंगतीत पाच हजारावर वारकऱ्यांनी रावळगावकरांच्या पुरणपोळीचा आस्वाद चाखला. गावातील पाचशेपेक्षा अधिक कुटुंबीयांनी तयार केलेल्या पुरणपोळी ८० कॅरेटमधून टेम्पोने पंढरपूरला नेण्यात आल्या.

सोबतीला जवळपास सात हजार कुरडई होत्या. पंढरपुरात रावळगावच्या माता-भगिनींनी रसई, भात, कुरडई, पापड व खीर तयार करून खानदेशी जेवणाचा स्वाद वारकऱ्यांना दिला. रावळगाव सप्ताह समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (More than 5000 people tested Puranpoli of Ravalgaon nashik news)

रावळगावला २६ ऑगस्टला अखंड हरिनाम सप्ताहात पंढरपूरचे नामदेव महाराज लबडे यांचे कीर्तन झाले, त्यातून महाराजांनी खानदेशची ओळख असलेली पुरणपोळी चंद्रभागेच्या तीरी होणाऱ्या संतपंगतीत देण्याची इच्छा बोलून दाखविली. सप्ताह समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी महाराजांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मोठी मेहनत घेतली.

गावात सणासुदीचे वातावरण

ग्रामस्थ व माता-भगिनींना पुरणपोळी, कुरडई, नागलीचे पापड देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला संपूर्ण गावातून प्रतिसाद मिळाला. प्रत्येक घरातून पाच, दहा, अकरा, एकवीस अशा संख्येने पुरणपोळ्या तयार झाल्या. पुरणपोळ्यांबरोबरच कुरडई, पापड जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

एखाद्या सणासुदीसारखे वातावरण गावात होते. घराघरातून पुरणपोळीचा स्वाद दरवळत होता. सर्वांनी स्वेच्छेने गावातील राम मंदिरात पुरणपोळी व कुरडया जमा केल्या. पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेत ८० कॅरेटमध्ये पुरणपोळी भरल्या. मोठ्या पाच बॉक्समध्ये कुरडई व नागलीचे पापड भरण्यात आले. या उपक्रमाला दानशुरांनी सहकार्य केले.

The mothers and sisters of Rawalgaon who are making Puranpoli with hard work
Nashik ZP News: जिल्हा परिषदेची समन्वय सभा मुख्यालयाबाहेर; कार्यालयात सुटीचे वातावरण

६० महिला, दोन ट्रॅव्हल्सने रवाना

पुरणपोळी, कुरडई, पापड घेऊन सप्ताह समितीचे २० पदाधिकारी दोन क्रुझरमधून तर दोन ट्रॅव्हल्समधून ६० महिला जल्लोषात पंढरपूरकडे रवाना झाले. पंढरपूरला रसई, दीडशे किलोचा भात, साडेतीनशे लिटर दुधाची खीर करण्यात आली. भजे, कुरडई व पापड तळण्यात आले. संतपंगतीत पाच हजार वारकऱ्यांना जेवण

वाढण्यासाठी रावळगावच्या माता-भगिनींना पंढरपूर येथील महिलांनी मदत केली. उपस्थित हजारो वारकऱ्यांनी भरपेट भोजन करून पुरणपोळी उरल्या. पांडुरंगाच्या पंढरीत संतपंगतीत रावळगावच्या नावाने झालेला जयजयकार प्रत्येक ग्रामस्थाला अभिमान वाटणारा ठरला. सत्कार समिती पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सांघिक प्रयत्नांना माता भगिनींच्या मिळालेल्या अनमोल पाठिंब्यामुळे हा अनोखा उपक्रम यशस्वी झाला.

"श्री क्षेत्र पंढरपूर येथील भव्य संत पंगत सोहळ्याचे यजमानपद यावर्षी रावळगाव सप्ताह समितीला मिळाले होते. गावातील माता, भगिनी व तरुण वारकऱ्यांनी यशस्वी नियोजन केले. संतपंगतीचा पाच हजारावर वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. रावळगावातील शेकडो पुरुष व महिलांनी हा नेत्रदीपक सोहळा अनुभवला." - युवराज कदम, अध्यक्ष, सप्ताह समिती, रावळगाव

The mothers and sisters of Rawalgaon who are making Puranpoli with hard work
Nashik News: जायकवाडी पाणी प्रकरणी उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

"सप्ताह समितीच्या संयोजनातून रावळगावकरांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे झालेल्या सप्ताहातील मांडे भोजनाचा आगळावेगळा उपक्रम यशस्वी केला. यामुळे रावळगावकरांचे नाव पंढरपूरच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. कार्यक्रमाच्या यशस्वितेमागे गावातील माता-भगिनींचा मोलाचा वाटा आहे. गावाचा एकोपा या कार्यक्रमात दिसून आला." - वासुदेव महाराज, भागवताचार्य, रावळगाव

"चंद्रभागेच्या तीरी, संतांच्या मांदियाळीत, पांडुरंगाच्या दरबारात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याचे भाग्य रावळगावकरांना मिळाले. मुक्ताबाईंना ज्ञानोबारायांनी मांडे भोजन खाण्याची इच्छा प्रकट केली होती. त्याप्रमाणे वारकऱ्यांच्या मांडे भोजनाची इच्छा रावळगावकरांनी पूर्ण केली. रावळगावकरांची पुरणपोळी नेहमीच स्मरणात राहील." - नामदेव महाराज लबडे, रामायणाचार्य, पंढरपूर

The mothers and sisters of Rawalgaon who are making Puranpoli with hard work
Abha Golden Card: आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरणात राज्यात नाशिक अव्वल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.