नाशिक : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर अनलॉकचा टप्पा सुरू झाला. अनेक व्यवसायिकांची आर्थिक गाही हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, अनलॉकच्या या टप्प्यात शिक्षण क्षेत्रातील खासगी क्लासेस (Privet Coaching Classes) मात्र ‘लॉक’ आहे. दीड वर्षात लॉकडाउन आणि अनलॉकमध्ये या क्षेत्राचा विचारच न झाल्याने जिल्ह्यातील सुमारे आठशेहून अधिक छोटे, मोठे क्लास बंद झाले. अनेक क्लासचालक, संचालक कर्जबाजारी झाले आहे. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी दुसरा व्यवसाय सुरू केला आहे. (more than 800 Privet Coaching classes in nashik district were closed in lockdown period)
मार्च २०२० मध्ये संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला. याचा फटका सर्वच क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्राला बसला. कोरोनाची पहिली लाट ओसरली तसे देशात अनलॉक सुरू झाले आणि अर्थचक्र फिरले. मात्र, शिक्षण क्षेत्राला याचा मोठा फटका बसला. अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाले.
जिल्ह्यात आज अंदाजे दोन हजार छोटे-मोठे क्लास आहेत. ऑनलाइन वर्गांमुळे खासगी क्लास पूर्णपणे बंदच झाले. यामुळे यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांपुढे जगण्याचा मोठा संघर्ष सुरू झाला. अनेकांना भाडे भरता न आल्याने जागा खाली कराव्या लागल्या. ज्याठिकाणी चार ते पाच शिक्षक कार्यरत होते, त्यांची नोकरी गेली. यामुळे क्लास चालकांनी घर चालविणेदेखील अवघड झाले. दुसरी लाट आल्यानंतर याचा मोठा फटका पुन्हा शिक्षण क्षेत्राला बसला. आता तीही ओसरली आहे. अनलॉक सुरू झाले, मात्र यात खासगी क्लासचालकांना या शासनाकडून कुठलीच सूट मिळाली नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील आठशेहून अधिक क्लास कायमचे बंद झाले आहे.
शाळा व महाविद्यालये ही बंद असल्याने अनेक जर तर क्लासलाच येत नसल्याने फीचा संबंध येत नाही. अनेकांकडे फी मागितल्यास लॉकडाउनचे कारण दिले जात असल्याने तीही मागता येत नसल्याचे क्लास चालकांकहून सांगितले जात आहे. आज किंवा उद्या क्लास चालू होतील, या आशेवर जे कोणी ऑनलाइन क्लास घेत आहे. ते देखील स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शिकवित आहे, मात्र त्यांनादेखील प्रतिसाद खूप कमी आहे.
परवानगी मिळायली हवी
अनलॉकमध्ये शासनाकडून ५० लोकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित व साजरे करण्यास परवानगी दिली आहे. अशी परवानगी खासगी क्लास चालकांनादेखील देण्यात यावी. मुळात आता १ ते १० चे क्लास घेणाऱ्या अनेक खासगी क्लासमध्ये ५० च्या आतच विद्यार्थी असल्याने शासनाने त्यास परवानगी दिली पाहिजे.
लॉकडाउनमुळे अनेक छोटे क्लास बंद पडले आहे. ऑनलाइन क्लासलादेखील खूप कमी प्रतिसाद मिळतो. यात फीचा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कमी मुलांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून क्लास सुरू करण्यास परवानगी मिळायला हवी
- विवेक भोर, उपाध्यक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटना, नाशिक
अनलॉकमध्ये शासनाकडून खासगी क्लास चालकांसाठी कुठलाच ठोस निर्णय झालेले नाही. त्यामुळे दीड वर्षात जिल्ह्यातील अनेक क्लासचालकांनी क्लास बंद करून इतर व्यवसाय निवडला. आता खासगी क्लास चालकांबाबत निर्णय झाला, तर पुढील दोन वर्ष क्लासचालकांनी स्थिर होण्यासाठी लागणार असल्याने आमचा विचार होणे गरजेचे आहे.
(more than 800 Privet Coaching classes in nashik district were closed in lockdown period)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.