Motivational Story : रत्नाताईंची एसटी बस पोहोचली महाराष्ट्रात

Jidd Sadar
Jidd Sadaresakal
Updated on

नाशिक : संकटं आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतात. जगण्याची वाट भक्कम करायची असेल तर संकटांनाच संधी मानून आयुष्याला आकार द्यायचा असतो, या विचारांतून तिचीही वाटचाल सुरू होती. कुटुंबाच्या वाट्याला आलेलं गरिबीचं आयुष्य बदलण्यासाठी थेट गाव सुटलं... कष्टावर विश्वास असलेल्या विचारसरणीचा अंगीकार करतानाच पतीलाही आधार देत पारंपरिक सुतारकामाला आधुनिकतेची जोड देत थेट समाजाची गरज ओळखून एसटी बस, वाहनांचे मॉडेल तयार करण्याच्या व्यवसायातून महाराष्ट्रभर पोहोचल्या त्या नाशिकच्या सिडकोतील महाराणाप्रताप चौकात राहणाऱ्या रत्नाताई वाघ...।

रत्ना निवृत्ती वाघ, शिक्षण बारावी पास... माहेर मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी तर सासर खानदेशातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील... वडील बबनराव कौतिक खैरनार यांचे पत्नी उषाबाई, तीन मुली व १ मुलगा असे कुटुंब. बबनराव खैरनार यांचे गावातच फेब्रिकेशनचे दुकान होते. सहा सदस्यांचे कुटुंब सांभाळताना मात्र मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. रत्नाताई मुळातच हुशार होत्या. बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर पुढे नोकरी करण्याची इच्छा होती, मात्र वडिलांनी रत्नाताईंच्या विवाहाचा निर्णय घेतल्याने शिक्षण थांबले. (Motivational Story of Women Ratnani Journey written In Jidd Sadar Nashik News)

Jidd Sadar
Nashik News : मनातल्या विचारांवर आधारलेले चेटूकवारं; राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

रत्नाताईंचा विवाह १९९६ मध्ये मेहुणबारे येथील निवृत्ती वाघ यांच्याशी झाला. निवृत्ती यांचा ड्राईंगचा डिप्लोमा झालेला होता. मात्र नोकऱ्यांमधील असलेल्या स्पर्धेने निवृत्ती यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. सासरी मेहुणबारे येथेही सासू-सासर्यांसह तीन भावांचे कुटुंब असल्याने गरीबी पाचवीलाच पुजलेली होती.

सुतारकामावर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या रत्नाताईंच्या वाघ कुटुंबाला स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसल्याने थेट कुटुंबाने नाशिक गाठले. याच काळात निवृत्ती वाघ यांना औद्योगिक वसाहतीत हंगामी नोकरी मिळाली, पगार तुटपुंजा होता... कुटुंबाला हातभार लागावा यासाठी नोकरी सांभाळून निवृत्ती वाघ लाकूडकाम तसेच इलेक्ट्रीक बोर्ड तयार करण्याचे काम करत होते. या कामात रत्नाताईंनी पुढाकार घेतल्याने त्यांना चांगली मदत होत होती.

इलेक्ट्रीक बोर्ड खाचून देण्याचे काम त्या करत असल्याने त्यातून कुटुंबाला मदत होत होती. पत्नीने या कामात घेतलेल्या पुढाकारामुळे निवृत्ती वाघ यांचेही त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने त्या या कामात पारंगत झाल्या. याच काळात कुटुंबात स्नेहल, संजना तसेच हर्षल या तिघांच्या निमित्ताने परिवार वाढला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Jidd Sadar
Nashik News : तालुकानिहाय 100 बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर

पारंपरिक व्यवसायाला दिली आधुनिकतेची जोड

पारंपरिक सुतार व्यवसायाला पुढे नेत असतानाच याच काळात निवृत्ती वाघ लाकडाच्या मूर्ती, देवाच्या मूर्ती तयार करू लागले. याच कामात मदतीचा हात पुढे करतानाच रत्नाताई यांनी यूट्यूबवरील वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेत थेट विविध एसटीबसेस तसेच वाहनांच्या मॉडेल तयार करण्याच्या पद्धती आत्मसात केली. रत्नाताईंच्या कामातील कलाकुसर बघून निवृत्ती यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. याच काळात पती निवृत्ती यांची नोकरी सुटली आणि कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले. मात्र रत्नाताईंनी उभ्या केलेल्या आत्मविश्वासावर त्यांनी पतीला आधार देतानाच यापुढे नोकरी न करण्याचा सल्ला देत याच व्यवसायात पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी दिलेला सल्ला वाघ कुटुंबासाठी मैलाचा दगड ठरला.रत्नाताई यांच्याकडे वेगवेगळ्या वाहनांचे मॉडेल तयार करण्याचे काम असतानाच पती निवृत्ती यांनी वेगवेगळ्या संस्था, संघटनांना लाकडापासून तयार केलेले सन्मानचिन्ह, ट्रॉफी, राष्ट्रपुरुषांच्या फायबर तसेच धातूंपासून मूर्ती तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. यात वाघ कुटुंबाची भरभराट सुरू झाली.

दिवसाला दोन एसटींची विक्री

रत्नाताईंनी तयार केलेल्या एसटी बसेस महाराष्ट्रभर विक्री होताहेत. दिवसाला किमान दोन बसेस तयार करून त्या विक्रीसाठी पाठवतात. फोम, फायबर यांच्यापासून तयार केलेल्या या बसेस तयार करताना फिनिशिंगकडे विशेष लक्ष दिल्याने उभेउभ आकाराची बसेस तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सुतारकामात महिला मागे असताना रत्नाताईंनी पारंपरिक व्यवसायाला पुढे नेतानाच या व्यवसायातही चांगल्या संधी असल्याचे दाखवून दिलंय. दर महिन्याला त्या ३० ते चाळीस बस तयार करून विक्री करतात. यासाठी लागणारे विविध सुटे भाग चाके, चेसी, सीट आदींसह इतरही साहित्य त्या स्वतःच तयार करतात. आठशे रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत मागणीनुसार बस, ट्रक आणि अन्य वाहनांच्या मॉडेल विक्रीतून महिन्याकाठी मिळणारे उत्पन्नही समाधानकारक असल्याचे त्या सांगतात.

Jidd Sadar
Nashik News : जिल्ह्यातील आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.