Motivational Story : गरिबीवर मात करीत जिद्दीने युवराज बनला अधिकारी

Yuvraj Gaware
Yuvraj Gawareesakal
Updated on

Nashik News : आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गरीब कुटुंबातील व उपेक्षित घटकातील युवराजने केवळ मेहनत आणि कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आहे एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून महसूल खात्याचा मोठा अधिकारी म्हणून युवराज कांताराम गवारे याची निवड झाली आहे. पुण्यात प्रशिक्षण घेत आहे. (Motivational Story Overcoming poverty Yuvraj stubborn become officer Nashik News)

ही तालुक्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब असल्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक तथा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, अधिकारी वर्गाने युवराजवर कौतुकाचा केला आहे.

युवराज गवारेने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, परिश्रमाच्या जोरावर आणि दुर्धर आजारपणाला बगल देत रात्ररात्र जागून केलेला अभ्यास, बारावी पास झाल्यानंतर साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला.

छोट्या-मोठ्या रेकॉर्डिंग करीत भोजपुरी चित्रपटाचे एडिटिंग संगीत अशा बाजूही सांभाळू लागला. हे करत असताना २०२१ मध्ये परीक्षा दिली. आणि त्याची महसूल अधिकारी म्हणून निवड झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Yuvraj Gaware
Motivational Story : एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया! ; संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.