Munia Bird : पावसाळयात दरवर्षी आमच्या घरी येणारी माहेरवाशीण मुनिया...

Munia bird
Munia bird esakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Munia Bird : एका छोट्या गावातून आलेला मनुष्य आपले लहानपण गावाकडील गोष्टी शेती मित्रमंडळी नातेवाईक या गोष्टींचा त्याला कधीही विसर पडत नाही असा नागरिक व छायाचित्र छंदी असलेला व निसर्गाच्या डोंगर कपरात आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या अर्थात कॅमेऱ्याच्या सहाय्यानं अनेक निसर्ग बद्ध फोटो आपल्या कॅमेरा त्यांनी कैद केले आहे. (Mountaineer Dilip Gite munia bird description nashik news)

सिन्नर तालुक्यातील मेंढी गावातील असलेले दिलीप यादवराव गिते हे गिर्यारोहक बरोबर दुर्गा भटकंती व छायाचित्रकार असून त्यांनी आजपर्यंत अनेक गड किल्ले सर केले आहेत. अशा ग्रामीण भागातील व्यक्तीला निसर्गाच्या काही अद्भुत किमया आपल्या कॅमेरात टिपून त्यांनी एका पक्षाचे वर्णन आपल्या बोलीभाषेत केले आहे. ते पुढील प्रमाणे-

माहेरवाशीणीचे आगमन …

आम्ही नवीन घरात रहायला आल्या पासून दरवर्षी खवलेवाली मुनिया पावसाळयात आमच्या घरी काही दिवसासाठी “माहेरवाशीण “ म्हणून रहायला येत असते. यावर्षी पावसाळा लांबल्याने जरा उशिराच तिचे आगमन झाले. मागच्या वर्षी एकच घरटे होते, यावर्षी मात्र दोन जोड्यानी दोन घरटे बनवले आहेत.

दिवसभर हिरवे गवताचे पाने, बारीक काड्या आणून गोलाकार घरटे बनवण्याचे काम चालू असते. घरटे बनवतांना नर आणि मादी दोघे पण काम करत असतात. दूर वर उडत जाऊन चोचीत हिरवे गवताचे पाते आणताना बघायला खूप मजा वाटते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Munia bird
Dodo Bird : 350 वर्षांपूर्वी लुप्त झालेला डोडो पक्षी पुन्हा घेणार जन्म, जाणून घ्या कसं?

गवत घेऊन येतांना तिला नकळत लपून तिचे फोटो काढणे माझा छंदच झाला आहे. घरटे तयार झाले की मादी अंडी घालते, अंडी उबवून पिल्लांना जन्म देते.

पिले मोठी झाली की परत निघून जाते. तिच्यासाठी आम्ही खिडकीत जागा करुन ठेवली आहे. जो पर्यंत पिले मोठी होत नाहीत तोपर्यंत आम्ही खिडकी उघडतच नाही. तिला व तिच्या पिलांना त्रास व्हायला नको म्हणून आम्ही त्यांच्यासाठी दानापाणीची पण व्यवस्था करुन ठेवली आहे. निसर्गांने प्रत्येक पशु पक्षाला स्वावलंबी बनवले आहे.

ते स्वतः चे कामे, स्वतःच करतात. अन्न , पाणी, निवारा स्वतःच शोधतात व पिलांना जन्म देउन त्यांना खाऊ पिऊ घालून सक्षम बनवतात. पिले मोठी झाल्यावर स्वतःचे जग तयार करतात. पक्षी पर्यावरण साखळी मधील एक महत्वाचा दुवा आहे . त्यांचे संवर्धन आपली सर्वांचीच जबाबदारी आहे आणि हो … सॉरी , सॉरी … बरं का … ती मुनिया आमच्या घरी रहायला येत नाही, तर आम्हीच तिच्या घरी रहायला आलो आहोत. कारण इकडे सर्व शेती, झाडे, वने होती. आपल्याला जागा कमी पडू लागली म्हणून त्या मुनियाच्या जागेवर अतिक्रमण करुन घर बांधले. मग आत्ता तिला तिच्या हक्काचे घर देणे हे आपले कर्त्यव्यच आहे, नाही का?

Munia bird
Nandur Madhyameshwar Bird Sanctuary : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पावसाळ्यामध्ये वाढला किलबिलाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.