NMC Administration: प्रशासकीय बदलांच्या हालचालीने धुसफूस! तांत्रिक संवर्गातील पदे उपायुक्तांच्या अधिनस्त

NMC Latest News
NMC Latest Newsesakal
Updated on

NMC Administration : तांत्रिक संवर्गातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, नगररचना तसेच बांधकाम विभाग उपायुक्तांच्या अधिनस्त आणण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने महापालिकेच्या अभियंत्यांमध्ये धुसफूस निर्माण झाली आहे.

त्याचा परिणाम कामकाजावर होताना दिसून येत असून, अभियंत्यांना तांत्रिक संदर्भातील प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रस्ताव मंजुरीसाठी उपायुक्तांच्या कार्यालयाच्या उंबरे झिजवावे लागणार आहे.

तांत्रिक संदर्भातील कामे अतांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांना करता येत नाही. शासन नियुक्त अधिकारी असले तरी तांत्रिक स्वरूपाची कामे करणाऱ्या अभियंत्यांची शैक्षणिक पात्रता व वेतन अधिक असल्याने ‘इगो’ निर्माण झाला आहे.

दुसरीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी टेबल वाढविण्याच्या भूमिका संशयास्पद ठरली आहे. (movement of NMC administrative changes Technical Cadre posts under Deputy Commissioners nashik

महापालिकेत प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने तांत्रिक व अतांत्रिक असे दोन संवर्ग आहे. अभियांत्रिकी संदर्भातील कामे तांत्रिक, तर प्रशासकीय व शासन नियमांची अंमलबजावणी करण्याची कामे अतांत्रिक संवर्गातील अधिकारी करतात.

विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, बांधकाम विभाग, नगररचना विभागात तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांची आवश्‍यकता आहे. परंतु आता प्रशासनात आयुक्त व उपायुक्त सर्वच नवीन आले आहे.

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर बदल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांची माहिती संकलित करण्याचा पहिला टप्पा पार पडला आहे. तांत्रिक संवर्गाशी संबंधित कामे किंवा प्रस्ताव मंजुरीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

त्या-त्या विभागांच्या प्रमुखांमार्फत अतिरिक्त आयुक्त किंवा काही विभाग थेट आयुक्तांना प्रस्ताव सादर करतात. परंतु आता तांत्रिक संवर्गासाठीदेखील उपायुक्त नियुक्त केले जाणार आहे. शासन नियुक्त उपायुक्तांमार्फत प्रस्ताव सादर होतील.

याचाच अर्थ शैक्षणिक अर्हता व वेतन अधिक असले तरी उपायुक्तांमार्फत विद्युत, बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा तसेच मलनिस्सारण विभागाचे प्रस्ताव जातील, अशी व्यवस्था महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत आणल्या जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Latest News
NMC Recruitment: मानधनावर रिक्तपदे भरण्याचे प्रयत्न

अतिक्रमण वगळणार

अतिक्रमण विषय महापालिकेसाठी सर्वाधिक डोकेदुखी असतो. परंतु तांत्रिक संवर्गाशी संबंधित कामे उपायुक्तांच्या अधिनिस्त आणताना अडचणीचा व नागरिकांशी तंटे होणारा अतिक्रमण विभाग मात्र अधिकाऱ्यांच्याच निगराणीत ठेवला जाणार आहे.

मलाईदार विभाग जर उपायुक्तांकडे जात असतील तर अतिक्रमण विभाग का नाही, असा सवाल अधिकारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

सेवानिवृत्तीनंतर होणार बदल

विद्युत, मलनिस्सारण, पाणीपुरवठा (यांत्रिकी) या तीन विभागाचा पदभार असलेले अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी सप्टेंबरअखेर सेवानिवृत्त होत आहे.

त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे बदल करण्याच्या हालचाली आहे. महापालिकेत अधिकारी नसल्याचे कारण देत बदल केले जात असल्याची चर्चा आहे.

अभियंत्यांमध्ये नाराजी

अधिकाऱ्यांच्या अतिक्रमणावरून अभियंत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शैक्षणिक अर्हतेचा विचार केल्यास तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न अभियंते सोडवू शकतात.

त्यामुळे उपायुक्तांची आवश्‍यकता नाही. शिवाय नाशिक महापालिकेच्या अभियंत्यांचा वेतनस्तर उपायुक्तांपेक्षा कमी असल्याने कमी वेतनाच्या अधिकाऱ्यांकडे प्रश्न कसे घेऊन जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

"तांत्रिक संवर्गासाठी उपायुक्त नियुक्त करण्याच्या निर्णयासंदर्भात पहिल्या टप्प्याची बोलणी झालेली आहे. परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही."

- लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, प्रशासन, महापालिका.

NMC Latest News
Nashik Parking Problem: अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक शाखेचा काणाडोळा! स्मार्ट रोडवरील कोंडीमुळे मनस्ताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()