नाशिक : शहरात वाहनतळांची कमतरता असल्याने पार्किंगची समस्या गंभीर आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यातच सध्या टोइंग बंद असल्याने धाक न राहिल्याने वाहतूक कोंडीत भर पडते आहे.
ई- चलनाद्वारे दंडात्मक कारवाईला मर्यादा पडत असल्याने सरतेशेवटी शहर पोलिसांकडून पुन्हा टोइंग सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत निविदा प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार असून, नवीन ठेकेदारास टोइंगची जबाबदारी दिली जाणार आहे. (Movement of towing again in city New contractor will be appointed soon Nashik News)
नाशिक शहरात नेहमीच वाहनांच्या टोइंगवरून वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत. जुलै २०२१ पासून तत्कालीन पोलिस आयुक्तांनी निविदा प्रक्रिया राबवून खासगी ठेकेदारामार्फत शहरात टोइंग कारवाई सुरू केली होती.
मात्र, टोइंग कर्मचारी आणि वाहनचालकांमधील खटके काही कमी झाले नव्हते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत टोइंग ठेकेदारास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. दुसरीकडे नाशिककरांनी शहरात वाहनतळांची मागणी लावून धरली असता, सदर बाब पोलिस अखत्यारीतील नसल्याने टोइंग कारवाई सुरू राहिली.
दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १५ फेब्रुवारीपासून शहरात सुरू असलेला टोइंग ठेका रद्द केला. तसेच, ई- चलनाद्वारे बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. परंतु ई- चलन कारवाईला मर्यादा पडते. परिणामी, टोइंग बंद असल्याने बेशिस्त चालकांकडून वाहने नो- पार्किंगमध्ये लावले जातात.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. यामुळे शहर पोलिसांनी पुन्हा टोइंग ठेकेदार नेमून कारवाई सुरू करण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. त्यासाठी आयुक्तालयाकडून लवकरच नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ई-चलन कारवाईचा परिणाम नाही
शहर वाहतूक पोलिसांकडून नो- पार्किंगसह वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई- चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. ई- चलनाचा दंड संबंधित वाहनचालकाच्या नावे पेडिंग असतो. असे थकलेला दंड मोठ्या रकमेत आहे. त्यासंदर्भात दरवेळी लोकअदालतीमध्ये थकीत दंड भरण्यासाठी वाहनचालकांना समन्स बजावले जातात.
परंतु त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ई- चलनाचा टोइंग इतका धाक वाहनचालकांमध्ये नाही. टोइंग कारवाईमध्ये वाहनचालकाला दंड भरल्याशिवाय वाहनाचा ताबाच मिळत नाही. त्यामुळे निदान वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त असावी, यासाठी टोइंग कारवाई गरजेचे असल्याचे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.