Nashik News: चांदशी शिवार मनपात समाविष्ट करण्याच्या हालचाली

NMC News
NMC Newsesakal
Updated on

Nashik News : महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या चांदशी शिवारात मोठ्या प्रमाणात जमिनीचे वाढलेले भाव व इमारत, बंगल्याची संख्या वाढत असल्याने संपूर्ण चांदशी शिवार नाशिक महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असल्याची बाब समोर येताना दिसत आहे.

नाशिक महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतर दहा वर्ष प्रशासकीय राजवट होते. १९९२ साली पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली. १९९२ ते २००० या कालावधीमध्ये नाशिक शहराचा विकास अगदी संथगतीने होता. त्यानंतर मात्र २०१२ पर्यंत शहराच्या विकासाला मोठी गती मिळाली. (Movements to include Chandshi Shiwar Municipality nashik news)

यामध्ये गंगापूर रोडवरील गंगापूर गाव व आनंदवली या शिवारात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली व याच भागात इमारतींची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली. नाशिक शिवारातील गंगापूर रोडच्या बाजूकडचा भागदेखील मोठ्या प्रमाणात विकसित झाला. आता या भागात विकास कामांसाठी जागा शिल्लक नसल्याने आता मखमलाबादकडे विकासाचा ओघ वाढला आहे.

मखमलाबादकडे लवकरात लवकर पोचण्यासाठी गोदावरी नदीवर दोन पूल टाकले जात आहे. त्यातील एक पूल न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित करण्यात आला आहे, तर अजून एका पुलाचे काम सुरू आहे. गंगापूर रोड व मखमलाबाद शिवार या पुलाच्या निमित्ताने जवळ येणार आहे. आनंदवली व मखमलाबाद शिवाराला लागूनच चांदशी शिवार आहे. या शिवारात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत.

परंतु मिळकतींची वाढलेली संख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीकडे तेवढ्या प्रमाणात निधी नाही. एनएमआरडीएकडे सर्वाधिक महसूल याच भागातून प्राप्त होतो. मात्र ‘एनएमआरडीए’ला निधी वितरित करताना सर्वत्र समान पद्धतीने वितरित करावा लागतो. त्यामुळे निधीची उपलब्धता असली तरी चांदशी शिवारात रस्ते, पाणी, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था यासारखी कामे करता येत नाही.

NMC News
Nashik Political: नाशिक तालुका शेतकी संघ निवडणुकीत ‘आपलं पॅनल’ची बाजी! पिंगळे गटाची सरशी; चुंभळे गटाला धक्का

नागरिकांचा शिवारात घरे घेण्याकडे कल

आमदार निधीतून सध्या कामे सुरू असली तर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तेवढ्या प्रमाणात गती मिळत नाही. बहुतांश नागरिकांचा शिवारात घरे घेण्याकडे कल आहे. आनंदवली परिसरात साडेतीन हजार रुपये चौरस मीटरपासून ते साडेपाच हजार रुपये चौरस मीटरपर्यंत फ्लॅट उपलब्ध आहेत.

मात्र पायाभूत सुविधा नसल्याने इमारती झाल्या तरी त्या घेताना ग्राहकांकडून पायाभूत सुविधांची विचारणा होत असल्याने हवा तसा विक्रीचा वेग प्राप्त होत नाही. त्यामुळे चांदशी शिवार नाशिक महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

पायाभूत सुविधांअभावी अडचण

आनंदवलीच्या बाजूला गोदावरीच्या पलीकडे चांदशी शिवार आहे. या शिवारात जमिनीचे भाव ३० ते ४५ हजार रुपये वार इतके झाले आहेत. याच भागात मोठे हॉटेल्स, शैक्षणिक संस्थादेखील निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायत हद्दीत असल्याने रस्ते, वीज, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था या पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीत समाविष्ट केल्यास या सुविधा तातडीने उपलब्ध होतील. सिंहस्थ निधीतूनदेखील या भागात पायाभूत सुविधा निर्माण करता येणे शक्य असल्याने त्याअनुषंगाने महापालिका हद्दीत चांदशी शिवार समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

NMC News
Nashik News: ‘सत्यशोधक’चा बिऱ्हाड मोर्चा स्थगित; महाजन यांची मध्यस्थी

Nashik News: मालेगावला लवकरच पोलिस आयुक्तालय; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()