Nashik : मोक्याच्या ठिकाणी BOT मिळकती विकासासाठी देण्याच्या हालचाली; आरक्षण तपासण्याच्या NMCच्या सूचना

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik : महापालिकेच्या मोक्याच्या जागांवरील मिळकती बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर विकसित करण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, बीओटीवर मिळकती विकसित करण्यापुर्वी त्या जागेवर पुर्वीचे आरक्षण तपासण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (Moves to provide BOT revenue for development at strategic locations NMC instructions for checking reservation Nashik)

महापालिकेत भाजपची सत्ता असताना प्रशासकीय राजवट लागु होण्याच्या दोन महिने अगोदर बाविस मिळकती बीओटी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, मोक्यावरच्या जागा असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला होता.

यातील अकरा मिळकती विशिष्ठ ठेकेदारांना विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बीओटीच्या प्रकरणाकडे संशयाने पाहिले गेले. बीओटीवर मिळकती विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परंतू, तत्कालिन आयुक्तांनी नियुक्ती रद्द केली. त्यानंतर सदरचा प्रकल्पच गुंडाळला गेल्याचे बोलले गेले. आता अकरा ठिकाणच्या जागा पुन्हा बीओटीवर देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NMC Nashik News
Nashik News : गणेशवाडी उद्यानाची मरणासन्न आवस्था! गवत वाढले, ॲंगल चोरीला अन्‌ स्वच्छतेचाही अभाव

त्यात सर्व्हे क्रमांक ७०८, अंतिम भुखंड क्रमांक ४५० नवरचना विद्यालय व मधुर स्वीटस, आरक्षण क्रमांक २३० (पै) अंतिम भुखंड क्रमांक ४५९ मॅग्नम हॉस्पिटल, गंगापूर रोड, सर्व्हे क्रमांक १०४/ब सातपुर टाऊन हॉल,

सर्व्हे क्रमांक ४८८/अ/ब द्वारका जुने मलेरिया कार्यालय, अंतिम भुखंड क्रमांक १६०, बी. डी भालेकर हायस्कुल, सर्व्हे क्रमांक २/अ सह अन्य महात्मा गांधी टाऊन हॉल, नाशिक रोड या जागा बीओटीवर विकसित करण्यासाठी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यासाठी संबंधित जागांवर आरक्षण होते का, ते तपासण्यासाठी नगररचना उपसंचालकांना सुचना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

NMC Nashik News
Dada Bhuse : प्रत्येकाने कर भरत देशाच्या अर्थव्यवस्थेला द्यावी गती : दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.