Nashik Onion Auction: कांदा लिलाव सुरू करण्याच्या हालचाली! व्यापारी ठाम राहिल्याने बाजार समित्यांची भूमिका

३०० कोटींचे व्यवहार ठप्प, नव्यांना परवाने देणार
onion auction
onion auctionesakal
Updated on

Nashik Onion Auction : जिल्ह्यातील कृषी उत्‍पन्‍न‍ बाजार समितीत गेल्‍या १२ दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद असल्‍यामुळे तब्‍बल ३०० कोटींचे व्‍यवहार ठप्‍प झाले आहेत.

आता कुठल्‍याही परिस्‍थितीत लिलाव सुरू करण्‍यासाठी बाजार समितीच्‍या सभापतींनी हालचाली सुरू केल्‍याने विंचूरपाठोपाठ निफाड बाजार समितीतही लवकरच कांद्याचे लिलाव सुरू होण्‍याची शक्‍यता आहे. (Moves to start Onion Auction role of market committees as traders remain firm nashik)

जिल्ह्यातील कांदा व्‍यापाऱ्यांनी आपल्‍या मागण्‍यांसाठी गेल्‍या २० सप्‍टेंबरपासून लिलाव बंद ठेवले आहेत. याविषयी तोडगा काढण्‍यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत कांदा व्यापाऱ्यांची बैठक घेतली.

त्यांच्यापाठोपाठ केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचीही बैठक पार पडली. पण व्यापाऱ्यांचे समाधान झाले नाही.

त्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. एवढे झाल्यानंतरही २९ सप्टेंबरला पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेऊन ‘नाफेड’मार्फत अधिक कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

पण कांदा व्यापाऱ्यांचा संप मिटविण्यात राज्य व केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. केंद्रीय मंत्री गोयल व राज्याचे पणनमंत्री सत्तार यांच्या भेटीनंतर व्यापाऱ्यांनी पिंपळगावलाही बैठक घेतली.

पण संप कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्यानंतर आता बाजार समित्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी (ता. २) महात्मा गांधी जयंतीनंतर कुठल्याही परिस्थितीत लिलाव सुरू करायचे, अशी भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे लवकरच लिलाव सुरू होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.

onion auction
Onion Export Duty: कांदा निर्यात शुल्काविषयी पुनर्विलोकनचा केंद्राचा विचार; केंद्र 2 लाख टन कांदा खरेदी करणार

व्‍यापाऱ्यांच्या मागण्‍या

- कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यातशुल्क कमी करावे

- ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत बाजार समितीत कांद्याची खरेदी करा

- हा कांदा रेशन दुकानातून विक्री करावा

- कांद्याच्या व्यापारावर सरसकट पाच टक्के सबसिडी द्यावी

- देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी द्यावी

- कांद्याचे भाव वाढल्यावर व्यापाऱ्यांची चौकशी करू नये

- बाजार समितीने मार्केट फीचा दर प्रतिशेकडा १०० रुपयास १ रुपयाऐवजी ०.५० पैसे करावा

- आडतीचे दर संपूर्ण भारतात एकसमान असावे

नवीन व्‍यापाऱ्यांना परवाने देण्‍याची तयारी

व्‍यापाऱ्यांनी बंद कायम ठेवल्‍यास त्‍यांचे परवाने नव्‍याने वितरित करण्‍यासाठी जाहिरात देण्‍याची तयारी काही बाजार समित्‍यांनी सुरू केली आहे. येत्‍या दोन दिवसांत संपाबाबत योग्‍य तोडगा न निघाल्‍यास हे परवाने दुसऱ्या व्‍यापाऱ्यांना देऊन बाजार समितीत लिलाव सुरू करण्‍याच्‍या हालचाली गतिमान झाल्‍याचे समजते.

"कांदा व्‍यापाऱ्यांनी पुन्‍हा बैठक बोलविली आहे. त्‍यांचा काय निर्णय होतो, ते बघणार आहोत अन्‍यथा त्‍यानंतर लिलाव कसे सुरू करायचे, याविषयी आमचे नियोजन सुरू आहे. लवकरच लिलाव सुरू होतील."

- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती

"विंचूरपाठोपाठ निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्‍यास तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अडचण दूर होईल. त्‍याचबरोबर लासलगावला लिलाव कसे सुरू करता येतील, यादृष्‍टीने आम्‍ही नियोजन करत आहोत. आम्‍ही नवीन मार्ग स्वीकारण्‍यापूर्वी व्‍यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले पाहिजे."- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती

"कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने पाठ फिरवल्यामुळे आम्ही अद्याप लिलाव सुरू करण्याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. जिल्ह्यातील व्‍यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत." - खंडू देवरे, अध्‍यक्ष, व्‍यापारी असोसिएशन, नाशिक

onion auction
Onion Crices : बाजार समित्या बंदचा असाही फटका ; व्यावसायिकांवर उपासमार ; कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.