मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था; खासदार गोडसे म्हणतात…

Mumbai-Nashik highway
Mumbai-Nashik highwaySYSTEM
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्गावरील नाशिक ते कसारा घाट दरम्यान असंख्य खड्डे झाले असून, यामुळे रोज अपघात होऊन अनेकजण मृत्युमुखी पडत आहे. या मार्गावरील घोटी येथील टोलनाका प्रशासन फक्त टोल वसुलीवर लक्ष केंद्रित करत असून, रस्ता दुरुस्त करा व मगच टोल वसुली करा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. रस्ता दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करत असेल तर वाहनधारकांनी टोल भरू नये, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. याबाबतची तक्रार ते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. (MP Godse said toll should not be paid if the repair of Mumbai-Nashik highway is neglected)

नाशिक- इगतपुरी- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा ते इगतपुरी या रस्त्याचे अवघे दोन महिन्यापूर्वीच काम झाले होते. मात्र रस्त्याची पूर्णता: वाट लागली आहे. रस्त्याची चाळण झाली आहे. नाशिक- इगतपुरी- मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा व प्रचंड वर्दळीचा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्यावर कामानिमित्त असंख्य वाहने रात्रंदिवस ये- जा करतात. जनतेचा रस्त्यावरील प्रवास अधिकाधिक सुखकर व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे रस्ते महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही रस्त्याची ही दुरवस्था पाहून या निधीला अन्यत्र पाय फुटत तर नाही ना असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. विल्होळीपासून ते कसारा घाट दरम्यान एक ते दीड फुटापर्यंत असंख्य खड्डे पडले आहेत. सर्वात जास्त खड्डे विल्होळी, गोंदे, घोटी, बोरटेंभा, पिंप्रीसदो चौफुली, घाटनदेवी परिसरातील महामार्गावर पडले आहेत. टोलनाका प्रशासनाने त्वरित रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहे.

नाशिक ते कसारा घाट दरम्यान पडलेल्या खड्ड्यांबाबत लवकरच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना कशी करता येईल, याकडे लक्ष वेधणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार

(MP Godse said toll should not be paid if the repair of Mumbai-Nashik highway is neglected)

Mumbai-Nashik highway
भाजपची दत्तक नाशिक मोहीम फोल; मनसेची टीका
Mumbai-Nashik highway
नाशिक मनपाच्या आरोग्य विभागातील ३५० पदांसाठी दीड हजार मुलाखती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.