मनमाड-इगतपुरी नवीन मार्ग कसारापर्यंत; खासदार गोडसेंचे रेल्वे मंत्र्यांना साकडे

Nashik mp hemant godase
Nashik mp hemant godaseGoogle
Updated on

नाशिक : मध्य रेल्वेकडून मनमाड- इगतपुरी दरम्यान टाकण्यात येणारा नवीन रेल्वे मार्गाची लांबी वाढवून ती कसारा स्टेशनपर्यंत करावी, खासदार हेमंत गोडसे यांच्या या मागणीला रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात लवकरच रेल्वेच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन रेल्वेलाइनचे सर्वेक्षण करून मनमाड- इगतपुरी या दोन मुख्य शहरांमध्ये टाकण्यात येणारी रेल्वे लाइन कसारापर्यंत टाकण्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. MP Godse demands to extend Manmad-Igatpuri new railway line to Kasara

दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशन वेळी खासदार गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेऊन या रेल्वे लाइन संदर्भात चर्चा केली. मंत्री दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच रेल्वे मंत्रालयाच्या एका विशेष पथकाकडून कसारा ते इगतपुरी दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी करण्यात येणार असून या संदर्भातला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार या नव्याने लाइन टाकण्याच्या कामाला मंजुरी देऊन रेल्वे मार्ग टाकण्याला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री दानवे यांनी खासदार गोडसे यांना दिले.

Nashik mp hemant godase
यंदाही गणेशोत्सवात कडक निर्बंध; 'अशी' असेल मंडळांसाठी नियमावली

घाट रस्त्याचा अडथळा दूर होणार

नाशिक ते मुंबई रेल्वेने जवळपास १८० किलोमीटर अंतर आहे. मात्र कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या घाट, डोंगर दऱ्यांच्या रस्त्यात रेल्वेला वाहतुकीला अनेक अडचणी येतात. यासाठी कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वे इंजिनाला अतिरिक्त इंजीन (बँकर) लावले जातात तरी देखील गाडी घाटात थांबत थांबत जाते. या नव्या रेल्वे लाइनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढविला जाणार आहे. इगतपुरी- कसारा दरम्यानचा घाट रस्त्यात ही रेल्वे लाइन टाकल्यामुळे वेगाने रेल्वे प्रवास होणे शक्य होणार असून नाशिक- मुंबई दरम्यान लोकल सेवा देखील यामुळे सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याच्या आशा पलवित झाल्या आहेत.

Nashik mp hemant godase
नाशिक : महिनाभरात डेंगीचे १९५, चिकूनगुनियाचे १८५ रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.