MP Hemant Godse: नाशिक लोकसभा मतदारसंघातील 30 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी; खासदार गोडसे

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांत मान्यता
MP Hemant Godse
MP Hemant Godseesakal
Updated on

MP Hemant Godse : जिल्ह्याच्या आदिवासी भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांत ३० कोटींच्या कामांना मान्यता मिळाली.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुरवस्था झालेल्या ग्रामीण आदिवासी तालुक्यासह नाशिक तसेच सिन्नर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना मदत होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. (MP Hemant Godse statement Approval of 30 crore roads in Nashik Lok Sabha Constituency nashik news)

नाशिक लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नाशिक या तालुक्यांतील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. गावांमधील रस्त्यांचे डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्याच्या पुरवणी मागण्यांत ३० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मान्यता देण्यात आली. यापैकी २० कोटी रुपयांची कामे आदिवासी विभागाकडून, तर उर्वरित दहा कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात येणार आहेत.

यात इगतपुरी तालुक्यातील खोडाळा- त्र्यंबक- देवगाव रस्ता येथे संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी १.२० कोटी, कुशेगाव ते भंबाळे फाटा रस्ता सुधारणेच्या कामासाठी १.२० कोटी, लहांगेवाडी ते गडगड सांगवी रस्त्याच्या बांधकामासाठी १.२० कोटी, त्रिंगलवाडी ते वाकी रस्त्याच्या सुधारणेसाठी दोन कोटी,

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग १६० ते आंबई रस्त्याचे पूल मोऱ्यांसह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तीन कोटी, मुळेगाव ते भोकरवाडी- दऱ्याचीवाडी ते अंजनेरी गड रस्त्याच्या बांधकामासाठी तीन कोटी, इतर जिल्हा मार्ग ५५ ते काथवडपाडा रस्ता सुधारणा २.४५ कोटी रुपये.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MP Hemant Godse
Nashik Water Shortage : सिन्नर तालुका अजूनही कोरडाठाकच; पावसावर केवळ 33 टक्के पेरणी

नाशिक तालुक्यातील गिरणारे ते साडगाव रस्ता सुधारणेसाठी दोन कोटी रुपये, रायगडनगर ते वालदेवी ते पिंपळद रस्ता सुधारणेसाठी १.५० कोटी रुपये, बेळगाव ढगा ते तिरडशेत रस्ता सुधारणा करण्यासाठी दोन कोटी रुपये या कामांचा समावेश आहे.

याबरोबरच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रा. मा. ३० ते अंजनेरी- मुळेगाव- जातेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी रुपये, देवरगाव- कुळवंडी- होलदारनगर रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा १३ यासाठी अडीच कोटी रुपये, निफाड तालुक्यातील इजिमा क्रमांक ४२ पिंपळस बसस्थानक दत्तमंदिर ते भाऊसाहेबनगर व्ही.आर. १२८ रस्ता काँक्रिटीकरण व डांबरीकरणासह मजबुतीकरणासाठी साडेचार कोटी रुपये या कामांचा समावेश आहे.

MP Hemant Godse
Nashik Quazi Gadhi: काझी गढी रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.