Sanjay Raut News : शिवसेनेच्या वाघांमुळेचं हिंदुत्वावरील कलंक दूर; खासदार राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाअधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sanjay Raut & Babri Masjid Demolition
Sanjay Raut & Babri Masjid Demolitionesakal
Updated on

नाशिक : शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वाला अनेक वर्षांपासून असलेला कलंक दूर झाला नसता. राममंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, असे म्हणणाऱ्यांसाठी अयोध्येतील कारसेवेवरील ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दालन खुले करण्यात आले आहे, डोळे उघडे ठेवून पाहिल्यास समजेल, असा हल्लाबोल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. २२) भाजपवर केला.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आता कुणी, कितीही श्रेय घेतले तरी लोकांना शिवसेनेचे अयोध्येतील योगदान माहीत आहे.

शिवसेनेतर्फे अधिवेशनस्थळी अयोध्येतील योगदानासंदर्भात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.

प्रदर्शनामध्ये बाबरी मशिदीचा पाडलेला ढाचा, आंदोलनात शिवसेनेचे योगदान, बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मांडण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी देसाई यांनी अत्यंत मेहनत घेतली.

अयोध्येला आपण जात नाही, अयोध्येच्या राममंदिर संघर्षात शिवसेनेचे जे योगदान आहे, ते सगळ्यांना माहीत व्हावे, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे सांगून खासदार राऊत म्हणाले, की प्रदर्शनातील चित्रांमध्ये तरुणपणीचे सुभाष देसाई आपल्याला दिसले होते.

शाळेतला मुलगा दप्तर घेऊन जातो, तसे ते पाठीला हत्यार बांधून चालले होते. मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. हा आमचा ठेवा आहे.

काही लोक असे म्हणतात, की शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Sanjay Raut & Babri Masjid Demolition
Ram Lalla Pran Pratishtha: पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात भाविकांनी घेतले ‘श्री काळारामा’चे दर्शन! भाविकांची लागली रांग

तिघांनी आंदोलन पुढे नेले

प्रदर्शन घाईने झाले, यात अजून सुधारणा होतील. संपूर्ण महाराष्ट्र हे बघेल. सुरवात आम्ही नागपूरपासून करणार आहोत. कारण फडणवीस यांची इच्छा आहे, की त्यांच्या काही स्मृतींना उजाळा मिळावा.

संपूर्ण देशातील रामसेवक तिथे उपस्थित होते. त्या वेळी सगळे हिंदू म्हणून जमले होते. तेव्हा पक्ष नव्हता, तीन प्रमुख नेते होते. ते म्हणजे अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवानी. त्यांनी आंदोलन पुढे नेले.

लोकांना प्रेरणा दिली. सामान्य लोकांना प्रेरित करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. काही लोक नागपूरची ट्रेन पकडायला गेले, ते फोटो दाखवताय. मात्र, अयोध्येत शिवसैनिक पोचले होते, असा टोला खासदार राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

अयोध्येचा सोहळा राजकीय इव्हेंट

अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे. परंतु भाजपने तो राजकीय इव्हेंट बनवला. त्याच्या माध्यमातून भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली आहे.

आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर भाजप सरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप करत या लोकशाहीविरोधी कृत्याचा निषेध आहे. हा हुकूमशाहीचाच प्रकार आहे. अयोध्येला आहे तेवढंच महत्त्व नाशिकच्या पंचवटीला आहे.

अयोध्येत श्रीरामाने राज्य केले, तर पंचवटीत त्यांचा संपूर्ण संघर्ष त्याग आणि लढ्याशी आहे. त्यामुळेच आम्ही अधिवेशनासाठी नाशिकची निवड केली. अधिवेशनाच्या रूपाने हुकूमशाहीविरोधातील संघर्षाला सुरवात केली जाणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut & Babri Masjid Demolition
Uddhav Thackeray News : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.