Shrikant Shinde : हे सरकार प्रत्येकाला आपलेसे वाटते! खासदार श्रीकांत शिंदे

While inaugurating the central office of Shiv Sena at Myco Circle on Sunday, MP Dr. Shrikant Shinde
While inaugurating the central office of Shiv Sena at Myco Circle on Sunday, MP Dr. Shrikant Shindeesakal
Updated on

नाशिक : लोकशाहीची निकड म्हणजेच देशाचा विकास. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे कोणतेही प्रश्न असो ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रयत्नशील असून, या सरकारने नऊ महिन्यांत धडाडीचे निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू केली आहेत.

त्यामुळे हे सरकार प्रत्येकाला आपलेसे वाटते, असे प्रतिपादन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. विरोधकांना मात्र सरकारचे काम सहन होत नसल्याने रात्र-दिवस फक्त खोके आणि खंजीरच दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (MP Shrikant Shinde statement on Inauguration of new central office of Shiv Sena nashik news)

मायको सर्कल येथ शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी खासदार शिंदे बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

खासदार शिंदे म्हणाले, की राज्यावर संकट आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरात बसून कोरडी आश्वासने दिली नाहीत. अगदी स्थानिक पातळीवर जाऊन लोकांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले व करत आहेत. नाशिकला जे जे लागेल ते देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे करत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा झाली पाहिजे. या नवीन कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या तथा प्रश्न मांडण्याची सुविधा होणार आहे. विरोधकांचा समाचार घेताना अडीच वर्षांत कोविडच्या नावाखाली काहीही कामे केली नाहीत.

नऊ महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे जनतेमध्ये आपल्या समस्या सोडवणारे सरकार आहे, असा विश्वास निर्माण झाला आहे, असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणे दिली.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की नाशिकच्या मध्यवर्ती भागात नव्याने झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील. विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपस्थितीत बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. येणाऱ्या काळात नाशिकचे नवे रूप पाहायला मिळेल.

While inaugurating the central office of Shiv Sena at Myco Circle on Sunday, MP Dr. Shrikant Shinde
Nashik News : मालेगावात 6 महिन्यांपासून रात्रंदिवस पथदीप सुरू; नागरिकांत संताप

आमदार सुहास कांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. नऊ महिन्यांत शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार केंद्रात आणि राज्यात जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

परिवर्तनाची नांदी ठरो

जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते प्रास्ताविकात म्हणाले, की शहरातील मायको सर्कल परिसरात हे कार्यालय उभारण्यात आले असून, कार्यालयात पदाधिकाऱ्यांना कामकाज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यासाठी हॉल तयार करण्यात आला आहे.

या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. वैद्यकीय कक्ष, विधी सल्ला कक्ष, सहकार सल्ला कक्ष, ग्राहक संरक्षण कक्ष आणि सरकारी योजनांची माहिती देणारा कक्ष आहे. हे कार्यालय परिवर्तनाची नांदी ठरेल.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

While inaugurating the central office of Shiv Sena at Myco Circle on Sunday, MP Dr. Shrikant Shinde
Shrikant Shinde यांच्या Nashik मधील कार्यक्रमात छोट्या वादकाची होतेय चर्चा Video Viral

उद्‌घाटनानिमित्त यांचा झाला सत्कार

(जॅक्सन वध खटल्यातील क्रांतिकारकांचे वंशज, काळाराम मंदिर सत्याग्रहातील सत्याग्रहींचे वंशज, काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा लावण्यासाठी गेलेले तरुण आणि रामसेवक)

भानुदास ब्रह्मदेव जोशी (वामनराव जोशी- काळेपाणी यांचे पुतणे), श्रीमती शरयू प्रकाश कुलकर्णी (जॅक्सन वध- आरोपी क्र. ४), धुंडा रामजी मारू, राजेंद्र दामोदर गायकवाड, शरद बापूराव काळे, दिनकर मोगल दाणी, किशोर शिवाजी काळे, तुषार रमेश गालिंदे, नरेंद्र वसंतराव देशमुख, संजय वामनराव लोणारी.

राममंदिर आंदोलनातील कार्यकर्ते ः प्रशांत कृष्णाजी शिंगणे, साहेबराव पंढरीनाथ पाटील, सुहास सुधाकर जपे, विनायक जगन्नाथ चांडक, सत्यकाम प्रकाश वर्मा, स्वप्ना एकनाथ सातपूरकर, रत्ना संजय पेठे, सविता अतुल संत (सरडे), वैजयंती श्रीकृष्ण सिन्नरकर, सचिन शिवराम पाटील, प्रताप मानकर गोपाळदास, अनिल गोकुळदास वाघ, किशोर विश्वनाथ वारे, श्याम चंद्रकांत घरटे, समीर रमेश देव

While inaugurating the central office of Shiv Sena at Myco Circle on Sunday, MP Dr. Shrikant Shinde
Maharashtra Politics: अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.