MPSC PSI: नाशिकचे उमेदवार झाले फौजदार! पोलिस उपनिरीक्षक परीक्षेची तात्‍पुरती निवडयादी प्रसिद्ध

MPSC Result 2023 PSI
MPSC Result 2023 PSI esakal
Updated on

MPSC PSI : पोलिस उपनिरीक्षक गट ‘ब’साठी २०२० मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेची तात्‍पुरती निवडयादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी (ता. ४) प्रसिद्ध केली. तात्‍पुरती गुणवत्तायादी व ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गाच्‍या ६५ राखीव जागांचा निकाल राखीव ठेवताना ही तात्‍पुरती निवडयादी प्रसिद्ध केली आहे.

या यादीत नाशिकच्‍या अनेक उमेदवारांनी स्‍थान पटकावले असून, फौजदार होण्याचे आपले स्‍वप्‍न त्‍यांनी पूर्ण केले आहे. (MPSC Nashik candidate became Police Sub Inspector Exam Provisional Selection List Released)

पोलिस उपनिरीक्षकपदासाठी २०२० ला झालेल्‍या परीक्षेच्‍या निकालाची उमेदवारांना दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. मध्यंतरी कोरोना महामारी व त्‍यानंतर अन्‍य विविध कारणांनी निकाल लांबणीवर गेला होता. मंगळवारी यादी अपलोड होताच यशस्‍वी उमेदवार व त्‍यांच्‍या मित्रपरिवाराने जल्‍लोष करत आनंद साजरा केला.

वैभव तिसावा, इतरांचीही भरारी

नाशिकच्‍या वैभव बाळासाहेब गुंजाळ याने निवडयादीत तिसावे स्‍थान राखत यशस्‍वी कामगिरीची नोंद केली आहे. त्‍याच्‍यासह मरकुटे अभ्यासिकेतील हेमंत पाटील, मनीषा चव्‍हाण, गायत्री तरडे यांनी यश मिळविले आहे.

युनिव्‍हर्सल फाउंडेशनमधील ललित मोरे, अभिजित इंगळे, ज्ञानेश्‍वर सानप, प्रशांत तक्‍ते, अमोल घंगाळे, योगेश चव्‍हाणके, हर्शल घागरे यांनी यशस्‍वी कामगिरी केली आहे. या उमेदवारांना प्रा. राम खैरनार, राहुल शिंदे, गिरीश कऱ्हाड, दीपक वडजे, डॉ. विशाल सोनकुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अश्‍वमेध करिअर ॲकॅडमी येथील प्रसाद जाधव, अर्जुन थेरे, जयश्री पाटोळे, प्रशांत ताकाटे, ज्ञानेश्‍वर सानप, रतन तरोटे, रविंकात भदाणे, संदीप मेधणे, मनीषा डावरे, गायत्री बैरागी, सिद्धेश बिडवर, अभिजित राजपूत, अभिजित इंगळे, पूजा जाधव, हेमंत पाटील यांच्‍यासह अन्‍य उमेदवारांनी यश मिळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MPSC Result 2023 PSI
Success Story: शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार! कारसुळच्या प्रशांत ताकाटेची खडतर प्रवासातून यशाला गवसणी

या उमेदवारांना मनीष बोरस्‍ते यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच या परीक्षेत नाशिकच्‍या सोनाली सोनवणे, कोमल जाधव, मनीषा चव्‍हाण, कविता देवरे, उमा कोटमे, सुरेखा बिडगर, पूजा जाधव, गायत्री बैरागी, प्रसाद जाधव यांनीही यशस्‍वी कामगिरी केलेली आहे.

गुणवत्ता क्रम बदलूही शकतो

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्‍टेड आउट) विकल्‍प सादर करण्याची प्रक्रिया बुधवार (ता. ५) पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना संकेतस्‍थळावर ११ जुलैपर्यंत विकल्‍प सादर करण्यासाठी मुदत दिलेली आहे.

ही मुदत संपल्‍यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. अर्जातील विविध दाव्‍यांच्‍या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्‍या दाव्‍यांमध्ये, शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो. उमेदवार अपात्र ठरू शकतो, असे आयोगाने स्‍पष्ट केले आहे.

MPSC Result 2023 PSI
Success story : आधी PSI नंतर तहसीलदार अन् आता पोलिस उपअधीक्षक! बदापूरच्या तरुणाच्या यशाचं कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.