MPSC Exam: दुय्यम सेवा मुख्य परीक्षेला उमेदवारांची झाडून हजेरी! 633 पैकी सहाशे परीक्षार्थ्यांनी दिली परीक्षा

mpsc exam
mpsc examesakal
Updated on

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२२ संयुक्‍त पेपर एक रविवारी (ता. १) पार पडला. या परीक्षेला उमेदवारांनी झाडून हजेरी लावली.

६३३ पैकी सहाशे परीक्षार्थ्यांनी केंद्रावर उपस्‍थित राहाताना परीक्षा दिली. दरम्‍यान, शंभर गुणांच्‍या या परीक्षेत मराठी, इंग्रजीच्‍या प्रश्‍नांनी उमेदवारांना घाम फोडला होता. (MPSC Secondary Service Mains Exam Candidates Attendance Sweep Six hundred out of 633 candidates appeared for exam nashik)

आयोगातर्फे यापूर्वी घेतलेल्‍या पूर्वपरीक्षेतून पात्रता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२२ चा संयुक्‍त पेपर क्रमांक एक रविवारी घेण्यात आला.

नाशिकमधील मेट भुजबळ नॉलेज सिटीच्‍या परीक्षा केंद्रावर झालेल्‍या या परीक्षेसाठी ६३३ उमेदवार प्रविष्ट झाले होते. त्‍यापैकी सहाशे परीक्षार्थ्यांनी हजेरी लावल्‍याने उपस्‍थितीचे प्रमाण ९५ टक्क्‍यांपर्यंत राहिले.

दरम्‍यान, विचारपूर्वक प्रश्‍न सोडवावे लागत असल्‍याने अनेक विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी कस लागला होता. मराठी, इंग्रजीसह चालू घडामोडींच्या प्रश्‍नांनी परीक्षार्थ्यांचा कस लागल्‍याचे सांगितले जात आहे.

mpsc exam
MPSC Typist Recruitment : एमपीएससीकडून टंकलेखक भरतीसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

आता पेपर दोनची तयारी

मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्‍त पेपर एक रविवारी पार पडला. आता पदनिहाय मुख्य परीक्षा येत्‍या महिन्याभरात पार पडणार आहेत. येत्‍या ७, १३, २१ आणि २९ ऑक्‍टोबरला पदनिहाय पेपर क्रमांक दोन पार पडणार आहेत.

यामध्ये दुय्यम निबंधक, राज्‍य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे व पुढील टप्प्‍यात पदाच्‍या आवश्‍यकतेनुसार मैदानी चाचणी पार पडेल.

mpsc exam
MPSC : सरकारी नोकरी करत 'शुभम'ने घातली यशाला गवसणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.