MPSC Success : जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक गटविकास अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या तामसवाडी (ता. निफाड) येथील आनंद कांदे या युवकाने दाखवून दिले आहे.
कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते, असा संदेशच जणू त्यांनी आपल्या यशातून दिला आहे. (MPSC success of Anand who lost parents 1st in State in Commission Assistant Group Development Officer Examination nashik news)
तामसवाडी येथील आनंद कांदे यांची कौटुंबिक परिस्थिती ही सर्वसाधारण... अनेक संकटांना तोंड देत आज चे यश पाहायला आई- वडील हवे होते, परिस्थिती ला सामोरे जातांना २००४ मध्ये आई कलावतीचे अपघाती निधन झाले तर २०१३ मध्ये वडील लक्ष्मण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यावर आजी बेबाबई कांदे यांनी भावंडाचा सांभाळ केला.
परिस्थितीला सामोरे जात आलेल्या अडचणींवर मात करत भाऊ चैतन्य व वहिनी मोनिका यांनी समर्थ साथ दिली.
आनंदाचे प्राथमिक शिक्षण हे तामसवाडी येथील जनता विद्यालयात झाले. पुढील शिक्षणासाठी नाशिक गाठले. सन २०१७ मध्ये संदीप फाउंडेशन येथून आय टी ची पदवी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२०२१ मध्ये परीक्षा दिलेल्या व नुकताच जाहीर झालेल्या निकालात आनंद कांदे यांनी सहायक गटविकास अधिकारी गट ब मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवत तामसवाडी गावासह तालुक्याचे नाव रोशन केले.
प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच त्याला हे यश मिळाल्याचं सांगताना आई- वडिलांची उणीव भाऊ चैतन्य व वहिनी मोनिकासह आनंद यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात आनंद दिसत होता.
"प्रयत्न अन आत्मविश्वास असेल यश दूर नसते, याचा हा प्रत्यय... भाऊ अन् वहिनी यांच्या पाठिंब्यामुळे या यशाचा मी मानकरी." - आनंद कांदे
"आनंद कांदे यांच्या यशाने गोदाकाठ भागासह तालुक्याचे नाव राज्यात रोशन केले असून ग्रामीण भागातील यश प्रामुख्याने दिसत आहे." - अनिकेत कुटे, ग्रामस्थ सायखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.