MPSC Success Story : शेतकरी पुत्राची पहिल्याच प्रयत्नात कृषी अधिकारी पदाला गवसणी

aadesh Khatik
aadesh Khatikesakal
Updated on

MPSC Success Story : जिद्द, मेहनत आणि पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्याची धमक असली की कुठलेही यश अवघड नसते. आपल्या आई-वडिलांनी ज्या शेतीत काबाड कष्ट केले, त्या कष्टाशी आणि मातीशी इमान राखायचे या इराद्याने बाभूळगाव (ता.येवला) येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तालुका कृषी अधिकारी पदालाही गवसणी घातली. (mpsc success story adesh khatik got post of agriculture officer in first attempt nashik news)

जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदेश नंदकुमार खाटीक यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आदेश हा मुळचा पाथरवाला (ता. नेवासा जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून त्याचे पालक शेती करतात. आदेशने २०१७ ते २०२१ दरम्यान कृषी महाविद्यालय, बाभूळगाव येथून कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सध्या तो कृषी महाविद्यालय,पुणे येथे कृषी किटकशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. बाभूळगाव येथे शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षापासूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवेचा अभ्यास करत होता.

aadesh Khatik
MPSC Success Story: दिंडोरी तालुक्यातील पौर्णिमा गावित आदिवासी मुलींमध्ये राज्यात प्रथम

येथून स्पर्धा परीक्षेच्या तयारीची बीजे मिळाल्यानंतर पुणे येथे एमएस्सी ॲग्रीची तयारी करतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन ही उंच यशाची भरारी घेतली आहे.

आदेशच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, संचालक रूपेश दराडे, कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.व्ही.डी.शेंडे, प्राचार्य डॉ.डी.पी.कुळधर, उपप्राचार्य डॉ.एस.डी.म्हस्के व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.

"विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून दिशा दिली की ते नक्कीच स्पर्धेत उतरतात हे आदेशने दाखवले आहे. आदेशच्या यशामुळे जगदंबा संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे." - रूपेश दराडे, संचालक,जगदंबा शिक्षण संस्था

aadesh Khatik
MPSC Success Story : एमपीएससीत सचिनचे दुहेरी यश! बेताच्या स्थितीवर मात करत गवसणी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.