Nashik : इथेही घडणार एखादे विश्‍वास नांगरे पाटील ! अभ्यासिकेमुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमागे...

दातलीत अभ्यासिकेमुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमागे, पहिलाच तरुण बनला पोलिस
IPS Vishwas Nangare Patil
IPS Vishwas Nangare Patil sakal
Updated on

वडांगळी - गावात वाचनालय अन अभ्यासिका असेल तर बत्तीस शिराळे (जि. सांगली) सारख्या खेड्यातून विश्‍वास नांगरे पाटील घडू शकतात, मग आपल्या गावातून का नाही या प्रेरणेतून वर्षभरापूर्वी दातलीसारख्या दुष्काळी टापूतील सिन्नरचे डॉ. भरत गारे यांच्या परिवारातील सदस्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाचनालय अन त्यातच अभ्यासिका सुरू केली.

गरजू, होतकरू मुलांसाठी ही मोठीच सुविधा मिळाली अन त्याचे त्यांनी अवघ्या वर्षभरातच सोनेही केले. या अभ्यासिकेत सुरवातीपासून असलेल्या विशाल तोंडे याची पोलिसात निवड झाली अन विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. याप्रेरणेतून येथूनही नक्कीच एखादा विश्‍वास नांगरे पाटील घडू शकतो हा आत्मविश्‍वास त्यांनी बोलून दाखविला.

अभ्यासिकेचा तेरा महिन्याच्या कालावधीत पहिला विद्यार्थी पोलिस दलात निवड झाली आहे. दातलीचा विशाल तोंडे याने पोलिस भरतीत गावाच्या वाचनालयात अभ्यास करून यश मिळवले आहे. दिवसभर शेतीकाम करायचं अन् ठरलेल्या वेळेत अभ्यासिका गाठायची. (mpsc upsc nashik police student IPS Vishwas Nangare Patil)

IPS Vishwas Nangare Patil
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या बैठकीत, काय ठरलं?

पुन्हा आई वडील अन् लहान भाऊ यांना शेतीची राहिलेले कामात जुपायचं अशी दिनचर्या ठेऊन विशालने अभ्यासिकेत मन लावून अभ्यास केला. गावातच ही सुविधा झाल्यामुळेच आपण हे करू शकलो असे तो अभिमानाने सांगतो.

सिन्नरमधील रहिवासी डॉ. भरत गारे व माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा गारे या परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन स्वर्गीय हरिदादा गारे सार्वजनिक वाचनालय सुरू केले. नव्या पिढीत अधिकारी व कर्मचारी गावातील झाले पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मागील वर्षं २६ जानेवारीला वाचनालय अन अभ्यासिकेची उभारणी झाली आहे.

अभ्यासिका सुरू करण्याचा मोठा फायदा होतकरू तरुण तरुणींना झाला आहे. आज या अभ्यासिकेत सुमारे पस्तीस विद्यार्थी पोलिस भरती व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. दातलीसह खंबाळे, शहापूर, खोपडी, भोकणी, केदारपूर या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याआधी सिन्नरला जावे लागत असे, सर्वांनाच हे शक्य होत नसल्याने या अभ्यासिकेमुळे त्यांचा मोठा प्रश्‍न मिटला आहे.

IPS Vishwas Nangare Patil
Sharad Pawar Resigns: लोकसभे’पर्यंत थांबा देशभरातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांची पवारांना साद

विशाल तोंडे शेतकरी तुकाराम दामोदर तोंडे व मनीषा तोंडे यांचा थोरला मुलगा आहे. सर्व तोंडे कुटुंब शेतात राबत आहेत. गावात अभ्यासिका असल्याने सिन्नरच्या अभ्यासिकेत जाण्याचा खर्च वाचला. त्यात शेतात काम करून आई वडिलांना विशालची मदत झाली. विशालने गावाच्या अभ्यासिकेत अभ्यास अन् कोणतेही पोलिस भरती क्लास ना पोलिस अकादमी भरती केली नाही.

गावगाड्याच्या वर्दळीत विशालने पोलिस भरती यश मिळवले. त्यांचे सर्व श्रेय तो दातलीच्या स्वर्गीय हरिदादा गारे सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका अन् मेहनतीला देतो. जिल्हा परिषद सदस्य वकील पंढरीनाथ चांदोरे, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. भरत गारे, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक उत्तम बोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विठ्ठल आव्हाड, रामनाथ चांदोरे, जया गोसावी, प्राजक्ता भाबड, हर्षल सोनवणे, मोनिका टोपे, रूपाली भाबड, अनिता शेळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.