MRF Mogrip Bike Championship: नाशिककरांनी अनुभवला व्रूम व्रूमचा थरार! एमआरएफ टूव्‍हीलर रॅलीचा अब्‍दुल वहीद विजेता

MRF Mogrip Bike Championship
MRF Mogrip Bike Championshipesakal
Updated on

नाशिक : व्रूमऽऽ व्रूमऽऽऽ आवाज करत वाऱ्याच्या वेगात धावताना हवेत झेपावणाऱ्या दुचाकी... गटातील इतर स्‍पर्धकांना मागे टाकत आघाडी घेण्यासाठीची चढाओढ... घसरताना, अडथळ्यांना सामोरे जाताना तोल सांभाळत सुसाट निघालेल्या गाड्या... असे थरार दृश्य नाशिककरांनी रविवारी (ता. २६) घोटी-वैतरणा रोडवरील धरनोली परिसरात अनुभवले.

एडब्ल्यू इव्हेंट आयोजित एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय दुचाकी स्पर्धेतील यंदाच्‍या हंगामात चमकदार कामगिरी करताना अंतिम फेरीत बाजी मारत अब्दुल वहीदने विजेतेपदावर आपले नाव कोरले. (MRF Mogrip Bike Championship Nashik people experience thrill Abdul Waheed Winner of Two Wheeler Rally Nashik)

या हंगामातील पाचवी व अंतिम फेरी नाशिकच्या घोटी-वैतरणा रोडवरील धरनोली गावाजवळ पार पडली. क्रीडाप्रेमींना निराश न करता स्‍पर्धेतील चालकांनी थरारक प्रात्‍येक्षिके दाखवताना स्‍पर्धेत आपापल्या गटातून आघाडी घेण्याचा प्रयत्‍न केला.

स्‍पर्धेत नाशिकच्या शमीम खानने आपल्या गटात दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत टीव्हीएस पेट्रोनासच्या चालकांचे वर्चस्व बघायला मिळाले. सकाळपासूनच क्रीडाप्रेमी स्‍पर्धास्‍थळी दाखल झालेले होते.

सुरक्षित ठिकाणाहून स्‍पर्धेतील थरार अनुभवताना अनेकांनी हे क्षण आपल्‍या कॅमेऱ्यात कैददेखील केले. स्‍पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांना श्रीरंग मत्से, ऐश्वर्या पाटील, अनिकेत इचम, सुरेश आण्णा पाटील, मधुसूदन यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

MRF Mogrip Bike Championship
Honda New Bikes : होंडाच्या प्रीमियम अन् स्टायलिश बाईक्सचे नवीन एडिशन लाँच, पाहा किंमत अन् फीचर्स

स्‍पर्धेतील गटनिहाय निकाल असा (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)

- मोटारसायकल ग्रुप बी २१० सीसी- अभिषेक परदेशी, कुणाल सिंग, अमरेंद्र साठे

- ग्रुपडी ४५० सीसी- सबरीश आर, उदयकुमार एम, अभिमन्यू राय

- महिला गट ग्रुप बी- तनाया सिंग

- स्कूटर गट २१० सीसी- शमीम खान, सहिद असिफ अली, कार्तिक एन.

- सुपर स्पोर्ट्स ५५० ग्रुप बी- दर्शन चौरे, संतोष सरकाले, नीलेश ठाकरे

- सुपर स्पोर्ट्स ४०० ग्रुप बी- रोहित शिंदे, तनय कंसारा

- सुपर स्पोर्ट्स २६० ग्रुप बी- इमरान पाशा, सचिन डी., पवन बी. के.

- सुपर स्पोर्ट्स १६५ ग्रुप बी- अबरार पाशा, मुजफ्फर अली, नीरज वांजळे

- सुपर बाईक एक्सपर्ट क्लास- अमोघ नाघ, वेणू रमेश कुमार

- सुपर बाईक प्रो-एक्सपर्ट क्लास- अब्दुल वहीद, सॅम्युअल जेकोब, युवा कुमार

सर्वसाधारण विजेतेपद- अब्दुल वहीद, द्वितीय- सॅम्युअल जेकोब, तृतीय- इमरान पाशा

MRF Mogrip Bike Championship
Nashik News: आमदार फरांदेंना शासनाकडून पाडव्याचा गोडवा! 7 लाखांचे अनुदान मंजूर करताना अन्य संस्थांबाबत दुजाभाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.