अंबासन, (जि.नाशिक) : हुश्श...झालीय बुवा एकदाची बस सुरू...गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरी स्तब्ध झाली होती. पुन्हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस रस्त्यावर धावण्यास सज्ज झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी बस गावात पोहचताच नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद वाक्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अवलंब करून रस्ता तिथे बस सुरू केली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून बस दिसेनाशी झाली होती. मध्यंतरानंतर काही अवधीत बससेवा टप्प्याटप्प्यावर सुरूही झाली. मात्र कर्मचाऱ्यांकडून विलिनीकरणासाठी उभारण्यात आलेल्या संपामुळे पुन्हा लालपरीला ब्रेक लागला होता. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आणि याचा फायदा खाजगी वाहनचालकांनी (Private Vehicle drivers) घेतला. वाट्टेल ते मनमानी प्रवास भाडे आकारून प्रवाशांची एकप्रकारे लुटच सुरू केली होती. यामुळे अनेक प्रवाशांनी आपल्या हक्काची बस सुरू होते तोपर्यंत चक्क प्रवासच केला नसल्याचे निदर्शनास आले आहे तर जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांनाही खाजगी वाहनचालक पिळवणूक करीत होते. दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस खेड्यापाड्यातून धावू लागताच गावागावातील नागरिकांकडून बसचे स्वागत करून चालक व वाहकांचे औक्षण केले जात आहे.
चालक-वाहकाचा सत्कार
अंबासन येथील बसस्थानकावर परिवहन मंडळाची बस पोहचताच नागरिकांनी आनंद व्यक्त करीत चालक व वाहकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यामुळे चालकवाहकची मने भरून आली होती. ग्रामीण भागात आजही लालपरी शिवाय पर्याय नसल्याने बस सुरू होताच प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. विद्यालयात पायपीट करीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही बससेवा पूर्ववत करावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
"अंबासन येथील नाशिक, अंबासन ही बस गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद होती. शुक्रवारी रात्रीतून पुन्हा बससेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांची सोय होणार असून आम्ही चालक व वाहकाचा सत्कार केला."
- चंद्रकांत कोर, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बागलाण.
"बससेवा बंद असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दूरवरचा प्रवास करणे कठीण होत होते. हक्काची बस सुरू झाल्याने मनाला आनंद होत आहे."
- युनूस शेख, ग्रामस्थ अंबासन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.