MSRTC Discount : जिल्ह्यात 21 लाख महिलांनी केला सवलतीच्या दरात प्रवास; कळवण डेपो अव्वल!

ST Discount
ST Discountesakal
Updated on

MSRTC Discount : महिला प्रवाशांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अर्ध तिकीट योजनेचा लाभ महिन्याभरात जिल्ह्यातील २१ लाख महिलांनी घेतला. लाभार्थी संख्येचा विचार करता जिल्ह्यात कळवण डेपो अव्वल असून, शेवटचा क्रमांक पेठ डेपोचा आहे. (MSRTC Discount 21 lakh women traveled at discounted rates in district Kalvan Depot Top nashik news)

या योजनेमुळे जिल्ह्यातील एकवीस लाख महिला लाभार्थींचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. राज्यात महिलांना एस. टी. प्रवासात सवलत मिळावी, अशी मागणी विविध महिला संघटनांकडून होत होती.

त्यानुसार महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांना टिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर केली. शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील महिलांकडून जोरदार स्वागत झाले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ST Discount
Chhagan Bhujbal : ‘पाणी पुरवठा़’चा पदभार प्रभारींकडे नको : भुजबळ

महिन्याभरात जिल्ह्यातील २१ लाख महिला प्रवाशांना या योजनेचा लाभ झाला आहे. त्यात, नाशिक- १ डेपोतील १ लाख १८ हजार ९०७, नाशिक-२ डेपोतील २ लाख २० हजार ५४५, मालेगांव- १ लाख ८८ हजार ७३४, मनमाड- ९५ हजार ८१७, सटाणा- २ लाख ३७ हजार १११, सिन्नर- २ लाख २७ हजार ८८६,

नांदगाव- १ लाख ४९ हजार १५७, ईगतपुरी- १ लाख ०४ हजार २५५, लासलगांव- १ लाख ४२ हजार १४७, कळवण- २ लाख ७२ हजार ७६५, पेठ- ९५ हजार ९३५, येवला- १ लाख ०७ हजार १२०, तर पिंपळगांव डेपोतील १ लाख ४५ हजार ५९२ महिला प्रवाशांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा ‍नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.

ST Discount
Nashik News : तुकडाबंदी दस्त नोंदणी पुनर्विलोकन याचिका फेटाळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()