MSRTC Fare Rates Hike : ‘ST' साठी शुक्रवारपासून मोजावे लागणार जादा भाडे!

MSRTC News`
MSRTC News`esakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिवाळीत हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. या शुक्रवार (ता. २१) पासून ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार आहे. दरम्‍यान, या वाढीमुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी साधारणतः दहा रुपये तर आंतरजिल्‍हा प्रवास चाळीस ते पन्नास रुपये जादा मोजावे लागणार आहेत. (MSRTC Fare Rate Hike ST will have to pay extra fare from Friday Nashik Latest Marathi News)

दिवाळी हंगामात परिवर्तनशील भाडे आकारणी संदर्भात एसटी महामंडळाने परिपत्रक जारी केले आहे. सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत जादा भाडे प्रवाशांना या कालावधीत द्यावे लागणार आहे. मध्यवर्ती कार्यालयाने परिवर्तनशील भाड्यासंदर्भात सूचनापत्र जारी केल्‍यानंतर नाशिक विभागीय कार्यालयाने सविस्‍तर तपशील जारी केलेला आहे. तालुकांतर्गत तसेच आंतरजिल्‍हा प्रवासी वाहतुकीसाठी यापूर्वीचे भाडे व हंगामातील भाड्याचा तपशील नमूद केलेला आहे. येत्‍या शुक्रवारपासून प्रवाशांना एसटीने प्रवास करताना काहीसा खिसा हलका करावा लागणार आहे.

MSRTC News`
Deputy Commissioner of Police संजय बारकुंड ठरले सायकलिंगचे ‘Super Randonneur’

प्रवासाचा तपशील सध्याचे भाडे हंगामातील भाडे

साधी शिवशाही साधी शिवशाही

कळवण ते नाशिक १२५ -- १३५ --

येवला ते नाशिक १३० -- १४५ --

लासलगाव ते नाशिक १०५ -- ११५ --

नाशिक बोरिवली २७० ४०० ३०० ४४५

नाशिक ते औरंगाबाद २९५ ४४० ३२५ ४८५

नाशिक ते धुळे २३५ ३५० २६० ३९०

नाशिक ते मुंबई २७० ४०० ३०० ४४५

MSRTC News`
Fake Medical Certificate Case : 'ते' 16 पोलिस कर्मचारी ‘Not Reachable’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.