MSRTC Bus Delay : पिंपळगाव बसस्थानकात वेळापत्रक नावालाच! नाइलाजाने प्रवाशांचा खासगी वाहनांकडे कल

Passengers sitting at the station waiting for the bus.
Passengers sitting at the station waiting for the bus.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बसस्थानकात प्रवशांसाठी लावलेले बसचे वेळापत्रक नावालाच उरले आहे. वेळापत्रकात दिलेल्या बहुतांश गाड्या विलंबाने धावत असल्याने व काही बस महामार्गावरूनच जात असल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.

नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे. (msrtc Pimpalgaon bus station schedule collapsed Unintentional trend of passengers towards private vehicles nashik news)

पिंपळगावच्या बसस्थानकात येणाऱ्या एसटी बस विलंबाने धावतात. याचा फटका प्रवाशांना बसतो. धुळे, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, नाशिक आगाराच्या बसला पिंपळगावच्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी बसस्थानकात येण्याची सक्ती केली आहे.

यातील काही बस येतात. पण त्यातील काही बस अर्धा ते एक तासाच्या विलंबाने येतात. त्यामुळे बस फलाटावर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. त्रस्त प्रवासी खासगी बसने निघून जातात.

मोठ्या बाजारपेठेचे शहर असल्याने व्यावसायिक, कामगार, नोकरदार मोठ्या प्रमाणात बसला प्राधान्य देतात. पण अपुऱ्या बस असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रवाशांच्या कामाचे नियोजन कोलमडत आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Passengers sitting at the station waiting for the bus.
RDSS Yojana : सिन्नरमधील 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज!

महामार्गावरून बसचा प्रवाशांना ‘टाटा’

महामार्गापासून पिंपळगावच्या बसस्थानक अर्धा किलोमीटर आत आहे. लांब पल्ल्याचे बसचालक बसस्थानकात येण्यास नाक मुरडतात. त्यातच वणी चौफुलीचा उड्डाणपुल किवा बाजार समितीसमोरील मार्गाने बस पुढे निघाली, ती चार किलोमीटर अंतरात उड्डाणपुलाला बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने बस थेट निघून जातात.

त्यामुळे बहुतांश बसचा महामार्गावरूनच प्रवाशांना टाटा करतात. खासगी वाहतुकदारांच्या हे पथ्थावर पडते. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद असलेल्या परिवहन महामंडळ खासगी वाहतुकीच्या हितासाठी आहे की काय, असा प्रश्‍न पडतो.

"मला लासलगावला जायचे आहे .चौकशी कक्षात बसचा दिलेला वेळ उलटून अर्धा तास झाला. बसस्थानकात बसून कंटाळलो आहे. थोडा वेळ वाट बघतो अन्यथा खासगी वाहनाने प्रवास करावा लागेल." -किसन गांगुर्डे (प्रवासी)

"एखाद्या बसमध्ये बिघाड झाला किंवा वाहुतक कोंडीमुळे व टोल प्लाझावरील रांगांमुळे बसला उशीर होतो. बस नियमित वेळेत ये-जा करण्यासाठी चालक-वाहकांना सूचना दिल्या आहेत."

-मनोज गोसावी (आगारप्रमुख, पिंपळगाव बसवंत)

Passengers sitting at the station waiting for the bus.
Nashik Crime News : डिझेल चोरट्यांना सायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले; मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.