ST Bus
ST Busesakal

ST बसला दे धक्का! दयनीय स्थितीमुळे रस्त्यावरच पडतात बंद

Published on

नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बस पूर्णपणे निकामी झाल्याचे दिसून येत आहे. याचा अनुभव गुरुवारी (ता. ८) नंदुरबार आगारामधून सुटणाऱ्या बोराळा एसटी बसमुळे आला. जगतापवाडी चौफुलीच्या उड्डाणपुलाच्या रहदारीवरच बस बंद पडली. त्यामुळे रहदारी ठप्प झाली होती. या वेळी वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी दिली.

याबाबत माहिती देताना श्री. शिंपी म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी बस (एमएच १४, बीडी १३५३) प्रवासी घेऊन नंदुरबारहून बोराळे येथे जात होती. गाडीचा अचानक मागील गिअर ब्लॉक झाल्यामुळे ही गाडी जागेवरच ठप्प झाली. त्यामुळे उड्डाणपुलाजवळच मुख्य रस्त्यावर गाडी मधोमध उभी राहिल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. शेवटी विद्यार्थ्यांनी खाली उतरून धक्का देत बस बाजूला केली. त्यामुळे या बसने विद्यार्थ्यांचाही घाम फोडला.

हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

त्या गाडीत विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. ती बस पुनश्‍च नंदुरबार आगारात न्यावी, असा निर्णय झाला. मात्र गाडी जागेवरून हालेना. रस्ता खुला करण्यासाठी सर्व प्रवासी, विद्यार्थी उतरवून अक्षरशः बसला धक्का मारावा लागला. बस मागे-पुढे केली. अखेर विद्यार्थ्यांनी हय्या-हूँ करत ताकदीनिशी धक्का मारल्यानंतर बस सुरू झाली.

ST Bus
आशादायक! आगीत संसार जळालेल्या आदिवासी कुटुंबाला गुरुकुलचा मदतीचा आधार

बस बदलून घ्याव्यात

अनेक बस तर निकामी झाल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची संभावना आहे. गाड्यांची अवस्था खूपच खराब झाली आहे. जवळपास ८० टक्के जुन्या बस आहेत. तसेच कामे करण्यासाठी लागणारे सुटे भाग उपलब्ध नाहीत. म्हणूनच आगारातून निघाल्यावर बस मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. बसची टायर रिमोट वापरली जात आहेत. बरेच टायर गुळगुळीत झाले आहेत. काहींच्या तर तारा दिसत आहेत.

वरिष्ठांनी लक्ष घालून होणारे धोके टाळावेत. महाराष्ट्रात एकूण १७ हजार बस आहेत. नंदुरबार आगारात ११० बस पैकी ८० जुन्या आहेत. काही तर अत्यंत खराब परिस्थितीत आहेत. जिल्हाभरात ३५० बसपैकी २०० ते ३०० बस जुन्या भंगार आहेत. बसच्या बॉडी अक्षरशः हलतात. मोठा आवाज येतो. जिल्हाभरात एक हजार ६०० कर्मचारी आहेत. जिल्ह्याचे उत्पन्न ३० लाखांहून अधिक आहे; परंतु प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नाहीत. अधिकारी व कर्मचारीदेखील त्रस्त झालेले दिसत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केली आहे.

ST Bus
Nashik Bus Accident: ''दैव बलवत्तर म्हणून दार उघडले नाहीतर...'' प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

''नंदुरबार आगारातील बस सुस्थितीत आहेत. मात्र काहीना काही तांत्रिक बिघाड होतो. त्यांची दुरुस्ती करून घेतो.'' -मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.