कळवणचा मेनरोड चिखलात..! नागरिकांना पायी चालणेही मुश्किल

Mud and potholes on the road in Kalvan
Mud and potholes on the road in Kalvanesakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ या म्हणीची प्रचीती देणाऱ्या आणि चौदा महिन्यांपासून रडतखडत संथ गतीने सुरू असलेल्या कळवण शहरातील मेन रोडवर रिमझिम पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचून खड्ड्यांचे डबक्यात रूपांतर झाले आहे. नागरिकांना पायी चालणे मुश्किल, तर वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. (Mud-and-potholes-on-the-road-in-Kalvan-marathi-news)

यंत्रणा सुस्त, नागरिक त्रस्त...

एक ते दीड वर्षापासून येथील मेन रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. अद्याप पन्नास टक्के कामही पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कामामुळे एका बाजूला ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले असून, त्यातील माती दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर पसरली आहे. दुसऱ्या बाजूला असलेल्या आधीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीचा चिखल झाला असून, मेन रोडवर सर्वत्र चिखल साचला आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचे रूपांतर डबक्यात झाले आहे. रस्त्यावरून वाहने जात असताना खड्ड्यांमधील पाणी पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याने वाद होत आहेत. बसस्थानकाजवळील पूल ते मराठी मुलांच्या शाळेपर्यंत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. डॉ. न्याती चौक परिसरात चिखलाचा गाळ झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. आधीच रस्त्याची एकच बाजू वापरासाठी सुरू असल्याने आणि त्यात आता पावसामुळे चिखलाची भर पडल्याने नागरिक त्रस्त झाले असून, मेन रोडचे काम पूर्ण होणार तरी कधी, असा प्रश्‍न पडला आहे.

Mud and potholes on the road in Kalvan
पशुवैद्यकांच्या संपाने सर्जा-राजाचा मृत्यू; गावात हळहळ

कामाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष..?

कळवण मेन रोडच्या कामाला वर्षभरापासून गतीच मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा या कामावर अंकुश नसल्याचे चित्र आहे. तर या कामाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मेन रोडच्या कामाचे कवित्व वर्षभरापासून सुरू असल्याने यंत्रणा सुस्तावली असली तरी नागरिक मात्र त्रस्त आहेत.

''मेन रोडवर सर्वत्र चिखल झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. वाहन चालकांनाही कसरत करावी लागत असल्याने संबंधितांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.'' - विनोद मालपुरे, शिवसेना उपशहरप्रमुख, कळवण

(Mud-and-potholes-on-the-road-in-Kalvan-marathi-news)

Mud and potholes on the road in Kalvan
ग्राहकाच्या वादातून दोन भावांवर कोयत्याने वार; घटना कॅमेरात कैद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()