Muharram 2023 : परंपरेनुसार अशुरा सण उत्साहात; घरोघरी फातेहा पठण

Immersion procession carried on shoulders of Tazia tribal brothers
Immersion procession carried on shoulders of Tazia tribal brothers esakal
Updated on

Muharram 2023 : मुस्लिम बांधवांकडून परंपरेनुसार अशुरा सण साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाला. घरोघरी फातेहा पठन करण्यात आले.

सायंकाळी ताजिया आणि सवारीची परिसरातूनच मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. मोहरम पर्वाची शनिवारी (ता. २९) अशुरा सणाने सांगता झाली. त्यानिमित्ताने घरोघरी फातेहा पठण करण्यात आले.

मशिदीमध्ये अशुराची विशेष नफल नमाज झाली. सामूहिकरीत्या अशुराची दुवा पठण करण्यात आली. वर्षभराचा विमा असे आशुराच्या विशेष दुवाचे महत्त्व आहे. (Muharram 2023 festival of Ashura was celebrated by Muslim brothers nashik news)

महिला आणि लहान मुलांकडून घरीच या दुवाचे पठण करण्यात आले. कुराण खानी तसेच नात-ए-पाकची मैफील झाली. प्रसाद स्वरूप शरबत, खिचडा वाटप करण्यात आले.

बडी दर्ग्यासह शहराच्या विविध दर्ग्यामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी ताजिया आणि सवारीची मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. सारडा सर्कल येथील प्रसिद्ध हलोका ताजियाची परंपरेनुसार इमानशाही दर्गा येथून सारडा सर्कल परिसरातून विसर्जन मिरवणूक काढत इमामशाही येथील दर्गा परिसरात विसर्जन करण्यात आले.

तत्पूर्वी सर्वधर्मीय भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याने गेल्या तीन दिवसापासून येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत यात्रेचा आनंद घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Immersion procession carried on shoulders of Tazia tribal brothers
Medical Admisssion : वैद्यकीयच्या नोंदणीसाठी या तारखेपर्यंत वाढीव मुदत

त्याचप्रमाणे सरस्वती नाला येथील हजरत सय्यद शहा वली बाबा यांच्या दर्ग्यात स्थापना करण्यात आलेल्या ताजिया आणि सवारीची परिसरातूनच मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले.

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॉम्बशोधक पथकानेही बडी दर्गासह विविध भागाची तपासणी केली. अशुराच्या दिवशी शरबतरूपी प्रसाद वाटपास महत्त्व आहे. त्यानिमित्ताने घरोघरी शरबत तयार करून वाटप करण्यात आले. शिवाय विविध सामाजिक, धार्मिक संस्था आणि तरुणांच्या ग्रुपने ठिकठिकाणी हजारो लिटर शरबत तयार करून भाविकांमध्ये वाटप केले. यानिमित्ताने हजारो लिटर दुधाची खरेदी विक्री झाली.

आदिवासी बांधवांना खांदेकरीचा मान

ताजियाची स्थापना करण्याचा मान इमानशाही येथील सय्यद कुटुंबीयांना आहे. गेली ३०५ वर्षापासून सय्यद कुटुंबीयांकडून परंपरेनुसार हलोका ताजिया तयार करून स्थापना केली जाते. असे असले तरी खांदेकरीचा मान मात्र आदिवासी बांधवांचा आहे. वर्षभर हे बांधव कुठेही असोत मोहरम पर्वात विर्सजनाच्या दिवशी ते आवर्जून उपस्थितीत राहतात.

Immersion procession carried on shoulders of Tazia tribal brothers
Muharram 2023 : ताजिया स्थापनेची 305 वर्षांची परंपरा; सय्यद कुटुंबीयांकडून जोपासना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.