नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) विविध प्राधिकरण मंडळांकरिता निवडणूक घेण्यात आली. (muhs election Counting of votes will on March 20 in university premises nashik news)
शुक्रवारी (ता.१७) राज्यातील ४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. यानंतर सोमवारी (ता.२०) सकाळी दहापासून विद्यापीठाच्या आवारात मतमोजणीला सुरवात होणार आहे. विद्यापीठातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ जबाबदारी सांभाळत आहेत. शुक्रवारी (ता.१७) राज्यभरातील ४२ केंद्रांवर ५७.८७ टक्के मतदान झाले होते.
विद्यापीठ अधिसभा, अभ्यासमंडळ, प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील मतदानाचा समावेश होता. निवडणुकीसाठी अकरा हजार ७४२ मतदारांपैकी सहा हजार ७९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राज्यात सर्वाधिक मतदान वाशीम जिल्ह्यातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालय येथील केंद्रावर झाले होते.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
मतदानाचे प्रमाण शंभर टक्के होते. सर्वात कमी अवघे १२.८१ टक्के मतदान पुणे येथील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे नोंदविले गेले. राज्यभरातील केंद्रांवरून येणाऱ्या मतपेट्या स्विकारण्याकरिता विद्यापीठ मुख्यालयात कक्ष कार्यान्वित केलेला आहे.
सर्व मतपेट्या संकलित झाल्यानंतर आता सोमवारी (ता.२०) सकाळी दहापासून मतमोजणीला सुरवात होईल. याच वेळी निकालदेखील जाहीर केला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.