MUHS Election Results : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थगित निवडणूकीचा निकाल जाहिर

MUHS
MUHSesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा स्थगित निवडणूकीचा निकाल जाहिर झाला आहे. आयुर्वेद विद्याशाखेसाठी विद्यापीठ अधिसभा व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

या निवडणूकीत आयुर्वेद विद्याशाखेतून अधिसभेकरीता श्रीमती प्रज्ञा राजेश कापसे विजयी झाल्या आहेत. (MUHS Election Results result of postponed election of University of Health Sciences declared nashik news)

याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठ निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (Senate) आयुर्वेद विद्याशाखेतून मुंबई येथील आर.ए. पोदार आयुर्वेद महाविद्यालयाच्या उमेदवार श्रीमती प्रज्ञा राजेश कापसे सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

तसेच अभ्यासमंडळाकरीता युनानी विषयातील ग्रॅज्युएट अॅण्ड पोस्ट ग्रॅज्युएट करीता सहा उमेदवार बिनविरोध निवडणून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता युनानी विषयातील ग्रॅज्युएट अॅण्ड पोस्ट ग्रॅज्युएट गटातील निवडणूकीत अख्तर हुसैन फारुकी, अतिकर रहेमान गुलाम सुलतानी, हकीम काझी राहिद अन्वर सायोद्दीन, जलील अहमद गुलराम रसुल, निसार अहमद मोम्म मुस्तफा व वासिम अहमद उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत.

आयुर्वेद व युनानी विद्याशाखेची निवडणूक मा. न्यायालयाच्या आदेशान्वये स्थगित करण्यात आली होती. सदर निवडणूक दि. 05 एप्रिल 2023 रोजी राज्यातील विविध मतदान केंद्रावर निवडणूक घेण्यात आली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

MUHS
NDCC Bank Recovery : जप्त वाहनांच्या लिलावाचा मार्ग खुला; न्यायालयाने स्थगिती उठवली

या निवडणूकीत एकूण 65.44 टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया विद्यापीठ मुख्यालयात पार पडली. आर.ए. पोदार आयुर्वेद महाविद्यालयाच्या उमेदवार श्रीमती प्रज्ञा राजेश कापसे यांना 682 इतके सर्वाधिक मत मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणूक निकाल जाहिर केला. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या समवेत निवडणुक मतमोजणीच्या कामकाजासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. उपकुलसचिव श्री. फुलचंद अग्रवाल तसेच उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. संजय नेरकर, डॉ. सुनिल फुगारे, अॅड. संदीप कुलकर्णी, श्री. राजेंद्र नाकवे, श्री. संजय कापडणीस, श्री. संदीप राठोड यांचा समावेश होता.

या कामकाजाकरीता श्री. अविनाश सोनवणे, श्रीमती रंजीता देशमुख, श्रीमती शैलजा देसाई, श्री. मोहन सोळशे, श्री. संजय सुराणा, श्री. आनंद जाधव, श्री. कृष्णा मार्कंड, श्री. विशाल सोनवणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

MUHS
Market Committee Election : प्रभावी युक्तीवादानंतरही पिंपळगांवला 15 अर्ज बाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.