MUHS
MUHSesakal

MUHS Post Graduate Result: आरोग्य विद्यापीठाचा पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा निकाल जाहीर

प्रात्यक्षिक परीक्षा १८ जुलैला संपल्या
Published on

MUHS Post Graduate Result : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ सत्रातील लेखी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन ऑफ अन्सर बुक’ प्रणाली राबवून प्रात्यक्षिक परीक्षा १८ जुलैला संपल्या आणि आज निकाल जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी ही माहिती दिली. (MUHS Post Graduate Medical Exam Result Declared Nashik news)

‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन ऑफ अन्सर बुक' प्रणाली हिवाळी-२०२३ सत्रातील परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमांना लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे डॉ. कानिटकर यांनी स्पष्ट केले. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले.

उत्तरपत्रिका ऑनलाइन प्रणालीद्वारे तपासणीसाठी विद्यापीठ संलग्नित ४१ वैद्यकीय महाविद्यालयांत ‘डिजिटल इव्हॅलेशन सेंटर’ची उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MUHS
‍Nashik News: दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप; येथे करावा अर्ज

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू म्हणाले, की २० जूनला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. मार्ड या विद्यार्थी संघटनेने अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या (राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त संस्थांमध्ये) प्रवेश प्रक्रियेस सहभागी होण्यासाठी सदर अभ्यासक्रमाचा निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने २० जूनपासून संचलित करण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय एम.डी., एम.एस., पदविका, एम.एस्सी. वैद्यकीय या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन’ पद्धत राबविण्यात आली. त्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून मान्यता घेण्यात आली आहे.

MUHS
Uddhav Thackeray Shivsena: नीलेश साळुंखे, सुनील जाधव, मसूद जिलानी यांची निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.