MUHS Summer Internship Program: आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एंन्‍ट्रन्‍सशिपचा प्रोग्रॅम; ही आहे मुदत

MUHS
MUHSesakal
Updated on

MUHS Summer Internship Program : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एन्‍ट्रन्‍सशिप प्रोग्रॅम २०२३ चे आयोजन केले आहे. याअंतर्गत उन्‍हाळी सुट्यांमध्ये संलग्‍न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची, कौशल्‍ये आत्‍मसात करण्याची संधी उपलब्‍ध होणार आहे. इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १० मेपर्यंत आहे. (MUHS Summer Internship Program deadline 10 may nashik news)

आरोग्‍य विद्यापीठातर्फे याबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले असून पात्रतेच्‍या अटींसह अन्‍य तपशील जारी केलेला आहे. त्‍यानुसार उन्‍हाळी सत्रातील सुट्यांमध्ये राज्‍यभरातील एसआयपी सेंटर येथे ही योजना राबविली जाणार आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्‍या तृतीय वर्षापर्यंतच्‍या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. येत्‍या १० मेपर्यंत इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सर्वसामान्‍य विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी पाचशे रुपये शुल्‍क असणार आहे.

निवड न झालेल्‍या विद्यार्थ्यांना पन्नास टक्‍के शुल्‍काचा परतावा दिला जाणार आहे. दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्‍यास त्‍यांच्‍याकडून शुल्‍क आकारले जाणार नाही. तर विद्यापीठाच्‍या आविष्कार स्‍पर्धेतील बक्षीस विजेत्‍या विद्यार्थ्यांना शुल्‍काचा परतावा दिला जाणार आहे.

विद्यावेतन, प्रमाणपत्रही

निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या विषयातील संशोधन करण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आवश्‍यक कौशल्‍ये आत्‍मसात करण्याची संधी उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. समर एन्‍ट्रान्‍सशिप प्रोग्रॅममध्ये निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना किमान दोन तर कमाल चार आठवड्यांसाठी अध्ययन केले जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

MUHS
Market Committee Election Analysis : अभिजित पाटलांचे बेरजेचे राजकारण यशस्वी! प्रस्थापितांना धक्का

या विद्यार्थ्यांना प्रती आठवडा अडीच हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाणार आहे. कमाल चार आठवड्यांचे विद्यावेतन दिले जाणार असल्‍याचे सूचनापत्रात म्‍हटले आहे. यशस्वीरीत्या शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे असे-

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत--------१० मेपर्यंत

प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया-----------१९ मेपर्यंत

तात्‍पुरत्या गुणवत्ता यादीची प्रसिद्धी-----२३ मे

यादीबाबत हरकतींची मुदत-----------------२४ मे

तात्‍पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीची प्रसिद्धी----२५ मे

गुणवत्ता यादीबाबत सूचना, हरकतींची मुदत-----२६ मे

सर्वसाधारण गुणवत्ता यादीची प्रसिद्धी-----------३० मे

MUHS
MPSC Combined Prelims Exam : एमपीएससी संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या पेपराची काठीण्य पातळी सौम्‍य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.