MUHS Winter Session Examination: ‘आरोग्य’च्या हिवाळी सत्र परीक्षेला 16 पासून सुरवात

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-२०२३ अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या टप्‍यातील परीक्षा १६ जानेवारीपासून सुरू होत आहेत.
MUHS
MUHSesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-२०२३ अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या टप्‍यातील परीक्षा १६ जानेवारीपासून सुरू होत आहेत.

याआधी दोन टप्यांत परीक्षा पार पडली आहे. विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र-२०२३ मधील परीक्षा राज्यातील एकूण १५७ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत.

या परीक्षेसाठी सुमारे ९६ हजार ३६१ पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. (MUHS Winter Session Examination will start from 16 nashik)

MUHS
Nashik CA Exam Result: सीए अंतिम परीक्षेत 128 विद्यार्थी उत्तीर्ण; नाशिकमधून प्रथम अटलचा अव्वल क्रमांक

ही परीक्षा ३ फेब्रुवारीपर्यंत पार पडेल. परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष बीडीएस, बीएचएमएस, (नवीन व २००५ वर्ष), फिजिओथेरपी (२०१२ आणि २०१५), बीपीओ (२०१७), तसेच बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय, तृतीय सत्र आणि एमबीबीएस (जुना व २०१९) या अभ्यासक्रमातील द्वितीय, तृतीय व चौथ्या सत्रातील अभ्यासक्रमांची परीक्षा होईल.

पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एम.एसस्सी नर्सिंग, फिजिओथेरपी, पदविका अभ्यासक्रम, एमबीएचे प्रथम सत्र, एम.एसस्सी फार्मास्‍युटिकल या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत.

परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली असल्‍याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले आहे.

MUHS
National Youth Festival : मोदींच्या सभेसाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोम; राष्ट्रीय युवा संमेलन तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.