Diwali 2023: मुहूर्त ट्रेडिंगला गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी! विविध शेअर्समध्ये कोटींपर्यंत झाली गुंतवणूक

Diwali 2023 share market
Diwali 2023 share marketesakal
Updated on

Diwali 2023 : लक्ष्मीपूजनानिमित्त सर्वत्र उत्‍साह बघायला मिळत असताना रविवारी (ता. १२) सायंकाळी मुहूर्त ट्रेडिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांकडून संधी साधताना जोरदार खरेदी केली.

स्‍थानिक स्‍तरावर विविध शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी सुमारे एक कोटींहून अधिकची गुंतवणूक या मुहूर्तावर केल्‍याचा ट्रेडिंग कंपनीच्‍या प्रतिनिधींनी अंदाज व्‍यक्‍त केला. (Muhurta Trading Heavy Buying by Investors Investments up to crores made in various shares Diwali 2023 Nashik)

दर वर्षी लक्ष्मीपूजनाला मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा आहे. या दिवशी सायंकाळी सव्वासहा ते सव्वासात या वेळेत शेअर बाजार खुले होत असते.

यादिवशी केलेली गुंतवणूक अक्षय असते, अशी मान्‍यता असल्‍याने गुंतवणूकदारांनी खरेदीचा मुहूर्त साधला. मुहूर्ताच्‍या दिवशी बाजाराची चाल सकारात्‍मक राहिल्‍याने गुंतवणूकदारांचा उत्‍साह अधिकच वाढला होता.

ट्रेडिंग कंपनीच्‍या माध्यमातून व अर्थविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ॲप्‍सच्‍या माध्यमातून खास मुहूर्त ट्रेडिंगसाठी खरेदीचे विविध पर्याय सुचविलेले होते. त्‍यानुसार गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्यात आली. सध्या तंत्रज्ञानामुळे व्‍यवहारात सुलभता आलेली असल्‍याने गुंतवणूकदारांनी ॲपच्‍या माध्यमातून खरेदीची संधी साधली.

Diwali 2023 share market
Lakshmi Pujan 2023: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत 20 टक्क्यांची वाढ! व्यावसायिकांमध्ये उत्साह

एक तासासाठीच्‍या या मुहूर्तावर अखेरच्‍या मिनिटापर्यंत खरेदीची लबबग सुरू राहिली. गुंतवणूक, तसेच ट्रेडिंग अशा दोन्‍ही स्वरूपात व्‍यवहार करण्यात आले. यापैकी फ्यूचर ॲण्ड ऑप्‍शन या प्रकारात व्‍यवहार करणाऱ्यांची संख्या अधिक राहिल्‍याचेही ट्रेडिंग कंपनीच्‍या प्रतिनिधींचे म्‍हणणे आहे.

मिठाई, सुकामेव्‍याने स्‍वागत

शहरातील ट्रेडिंग कंपन्‍यांच्‍या दालनांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. अधिकारी, कर्मचारी यांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली.

दालनातील भव्‍य स्‍क्रीनवर विविध शेअर्सची चाल पाहण्यासाठी गुंतवणूकदारांनीही उपस्‍थिती नोंदविली. आलेल्‍या आपल्‍या ग्राहकांचे यानिमित्त मिठाई, सुकामेवा देताना स्‍वागत करण्यात आले.

Diwali 2023 share market
Diwali 2023: लक्ष दीप हे उजळले घरी! बॉलिवूड कलाकारांनी अशी साजरी केली दिवाळी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.