Nashik News : रविवार कारंजा येथील यशवंत मंडई धोकादायक स्थितीत आल्याने जमीनदोस्त केली जाणार आहे. त्या जागेवर महापालिकेकडून बहुमजली पार्किंग उभारले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली.
इमारत जीर्ण झाल्याचा अहवाल सादर झाल्याने येथील २४ गाळेधारकांना महापालिकेने नोटीस पाठवून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Multi storied parking at Yashwant Mandai Parking slot usage will start under adjusted reservation Nashik News)
शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येत पार्किंग स्लॉटची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यांवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात.
यातून वाहनधारकांना मनस्ताप, हवा व ध्वनी प्रदूषण, वेळेचा अपव्यय, वाहतूक पोलिसांवर येणारा ताण या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी महापालिका आयुक्त ‘मिशन पार्किंग’ मोहीम राबवीत आहे.
जळगाव शहरात पार्किंगचा प्रश्न चांगल्या रीतीने हाताळताना तेथे पार्किंग स्थळे विकसित करण्याचा अनुभव असलेले उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे पार्किंगचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्यावर वाहने लावली जातात.
परिणामी वाहतूक ठप्प होते. वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असली तरी रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने महापालिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा मोफत वापर करतो वास्तविक हॉटेलचालकांना स्वमालकीची पार्किंग बंधनकारक आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र पार्किंगचा वापर हॉटेल व्यवसायासाठी होतो व वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहने केल्यास त्याचे चार्जेस हॉटेल चालकांकडून वसूल करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे शहरात अन्य पार्किंगची स्थळे शोधली जाणार आहे. महात्मा गांधी रस्ता सीबीएस तसेच शालिमार परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. या भागामध्ये पार्किंगसाठी स्लॉट उपलब्ध नाही.
त्यामुळे जिल्हा परिषद मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची जागा ‘पे ॲन्ड पार्क’ साठी वापरता येईल का या संदर्भात संबंधित यंत्रणेची चर्चा केली जाणार आहे.
महात्मा गांधी रस्त्यावर स्टेडिअम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या पार्किंगचेही तपासणी करून तेथेही पार्किंगची व्यवस्था करण्याची नियोजन आहे.
स्मार्ट रस्त्यावरील सायकल ट्रॅकच्या जागेचा कायमस्वरूपी पार्किंगसाठी ठेवण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे. शहरात समायोजित आरक्षणाखाली पार्किंग स्लॉट विकसित करण्यात आले. त्याचा वापर सुरू केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.