लॉकडाऊनमध्ये गृहलक्ष्मींची मल्टिटास्किंग भूमिका!

housewife
housewifeesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : एकावेळी वेगवेगळी कामे हाताळण्याचे कसब परंपरेनेच भारतीय महिलांच्या (indian woman) अंगी भिनवले आहे. लॉकडाउनचा काळ (lockdown) त्यांच्या कौशल्याची परीक्षा घेणारा ठरला आहे. एकाचवेळी कामांसोबत अनेक जबाबदाऱ्या, भूमिका वठवत गृहलक्ष्मींनी मल्टिटास्किंग (multitasking) असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.

मोलकरणींची कामेही गृहलक्ष्मीच्याच वाट्याला

व्याप वाढला, बचतही झाली... कामांचा व्याप वाढला असतानाच अनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी मोलकरणीचे काम तूर्त थांबविले आहे. तर काही मोलकरणींनी स्वतःहून कोरोनाचे कारण पुढे करीत काम बंद केले आहे. अशात मोलकरणींची कामेही गृहलक्ष्मीच्याच वाट्याला आली आहेत. नोकरदार महिलांना तर घरातील कामे जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेस ऑफिसकडून सोपविल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्याही ऑनलाइन व ऑफलाइन पार पाडाव्या लागत आहे. ऑफिस किंवा घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याची सिद्धता महिलावर्गाने मिळविली असून, महिन्याला सुमारे दोन हजार रुपयांची बचतही यानिमित्ताने होत असल्याचे चित्र आहे.

housewife
अखेर अगंबाई सुनबाई मालिकेतील कलाकाराने मागितली माफी!

आता दुपारीही उसंत नाही

लॉकडाउनमुळे साऱ्यांनाच घरी थांबावे लागले आहे. अशात नेहमीपेक्षा काही वेगळे करण्याचा बेत रोजच ठरतो. मोठ्यांकडून तसे फर्मान सोडले जाते. कुटुंबाच्या आनंदासाठी सारी कामे करण्यास गृहलक्ष्मी सज्ज असतात. एकाचवेळी वेगवेगळे पदार्थ तयार करणे, त्या वेळी मुलांची तयारी, त्यांचे हट्ट पुरविणे, मोठ्यांचा चहा- नाश्‍ता, पतीला घराबाहेर जावे लागत असेल तर त्यांची तयारी, त्यासोबतच जेवणाचीही तयारी महिला कोणत्याही कुरबुरीविना भराभर उरकतात. अनेक वर्षांच्या सरावातून त्यांच्याकडे ही निपुणता आली आहे. कौटुंबिक कामे उरकल्यानंतर दुपारी मिळणारी उसंत लॉकडाउनने घालवली आहे.

housewife
नाशिकची यॉर्क वायनरी लवकरच होणार सुला विनयार्डस‌मध्ये विलीन

शासकीय रुग्णालयांतील कर्तव्य निभावून घराच्या जबाबदाऱ्याही पार पाडत आहेत. घरातील मंडळीही मदत करतात. पण, ते इतरत्र व्यस्त असल्यास स्वत: कामे उरकल्याशिवाय पर्याय नाही. कोरोनात रुग्णसेवा व घराचे कामे पार पाडण्यात मनस्वी समाधान आहे. -सविता निकम, आरोग्यसेविका, महापालिका, नाशिक

सर्व सदस्य लॉकडाउनमध्ये घरातच आहेत. सध्या मोलकरणीचीही मदत नाही. कुटुंबातील प्रत्येकाच्या वेगळ्या फर्माईश असतात. थोडी कसरत होते. पण, त्यातही मजा आहे. -चित्रा शिंदे, चांदवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.