नवीन कसारा घाटात ब्रेक फेल; ट्रक कोसळला 100 फूट खोल दरीत

Accident
AccidentSaka
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) भीषण अपघात झाला असून नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक शुक्रवार (ता. ६ रोजी) पहाटे चार वाजेच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात १ जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टिमच्या तरुणांनी मयत व जखमींना दरीच्या बाहेर काढुन रुग्णालयात पाठवले. नवीन कसारा घाटात नाशिकहुन मुंबईच्या दिशेने बॉटल घेऊन जाणारा मालवाहु ट्रकचे ( एम. एच. 12 एच. डी. 8355 ) घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक थेट १०० फुट दरीत कोसळला. या अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन टिमचे प्रमुख शाम धुमाळ यांना समजताच त्यांनी आपल्या टिमच्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी आंधारात १०० फुट खोल दरीत उतरून मदतकार्य सुरु केले.

Accident
नाशिक महापालिकेत बदल्यांचा वारू उधळला


भरपावसात पहाटे ४ ते सकाळी ७ वाजे पर्यंतच्या अथक प्रयत्नाने गंभीर असलेल्या ३ जखमींना सुखरूप बाहेर काढले वाहन चालक गोकुळ शिवाजी बोडके, वय ३१ वर्ष, रा. नाशिकरोड याचा जागीच मृत्यू झाल्याने मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन टि प्रमुख शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी, बाळू मांगे यांच्यासह टोलप्लाझाचे कर्मचारी व महामार्ग सुरक्षा पोलीस पथक यांनी ३ तास अथक प्रयत्न करून अपघातात जखमी झालेले अमित चंद्रकांत कुलकर्णी, योगेश संजय पाडळे, वय ३५ व शिवा (पुर्ण नाव माहित नाही ) सर्व राहणार नाशिकरोड येथील असुन या ३ गंभीर जखमींना वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले असुन त्यांना उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले.

Accident
नाशिक सिटी बससेवा सुसाट; हजारो प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()