Nashik : Mumbai- Agra National Highway बनला मृत्यूचा सापळा

Vehicles running erratically near the Lubbock Hotel on the highway.
Vehicles running erratically near the Lubbock Hotel on the highway.esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई- आग्रा महामार्गावरील चांदवडचा घाट ते वडाईभोई हा रस्ता पूर्वी अपघाताचे माहेरघर ठरला होता. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर या टप्प्यातील अपघाताचे प्रमाण खूपच कमी झाले. महामार्गावरील येथील मनमाड चौफुली ते चाळीसगाव फाटा अपघाताचे नवे केंद्र झाले आहे. या पट्ट्यात गेल्या दोन वर्षात लहान मुले, प्रौढ, महिला, दुचाकी चालक यासह ९२ नागरिकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. ५७ प्रवासी गंभीर जखमी झाले. महामार्गावर मनमाड चौफुली ते चाळीसगाव फाटापर्यंत सर्व्हिस रोड नसल्याने अपघात होत आहे. (Mumbai Agra National Highway become death trap increase in accidents Nashik Latest Marathi News)

महामार्गावरील हॉटेल लब्बैक, सवंदगाव फाटा, चाळीसगाव फाटा हे ठिकाण अपघाताचे केंद्र बनले आहे. या रस्त्यावर सर्व्हिस रोड व भुयारी मार्ग बनवावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. रस्ते महामार्ग व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातत्याने अपघात होवून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. शहरातील पूर्व भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३ च्या पलीकडे लब्बैक हॉटेल, गट नं. ८०, गट नं. ७६, असफा इब्राहिम मस्जिद, अनिस क्रेनवाला सायजिंग व नागरी वस्त्या उदयास आल्या आहेत.

परिसरात हजारो नागरिक वास्तव करीत आहेत. या भागातील नागरिक कामासाठी रस्ता ओलांडून शहरात येतात. महामार्गावर भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड नाही. या महामार्गावर ठिकठिकाणी दुभाजक तोडून नागरीकांनी ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ढम्पर, मालवाहतुक रिक्षा वाहतूक करतात. महामार्गावर सर्व्हिस रोड नसल्याने विरुद्ध बाजूने ट्रॅक्टर, ट्रक, डम्पर, माल वाहतूक रिक्षा, कन्टेनर वापरतात. समोरुन भरधाव येणाऱ्या गाडीला विरुद्ध येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

भुयारीमार्ग व सर्व्हिस रोड नसल्याने नागरिक जीव मुठीत धरुन प्रवास करतात. मनमाड चौफुली ते चाळीसगाव फाट्यापर्यंत रस्त्यावर लहान गतिरोधक आहेत. त्यांना पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना गतीरोधक दिसत नाहीत. यासाठी येथील विविध पक्षांनी आंदोलने केली. लब्बैक हॉटेल, सवंदगाव फाटा या ठिकाणी सर्वात जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने तातडीने भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख व नागरिकांकडून केली जात. येथे पवारवाडी, किल्ला, तालुका पोलिस ठाणे या तीनही पोलिस ठाण्यात अपघातात ९२ नागरिकांनी जीव गमाविला. तर ५७ नागरिक अपघातात गंभीर जखमी झाले.

Vehicles running erratically near the Lubbock Hotel on the highway.
Nashik: संकटग्रस्त यादीतील ‘Greater Spotted’ गरुडाचे नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये दर्शन

२०२१ मधील मृत्यू व जखमी

पोलिस ठाण्याचे नाव - मृत्युंची संख्या - जखमींची संख्या

पवारवाडी पोलिस ठाणे - १५ - १३

तालुका पोलिस ठाणे - ३७ - ११

किल्ला पोलिस ठाणे - २ - ७

२०२२ मधील मृत्यू व जखमी

ठाण्याचे नाव - मृत्युंची संख्या - जखमींची संख्या

पवारवाडी पोलिस ठाणे - ८ - ७

तालुका पोलिस ठाणे - २८ - १७

किल्ला पोलिस ठाणे - २ - २

Vehicles running erratically near the Lubbock Hotel on the highway.
Online Shoppingने बाजारपेठा ओस; मनमाडला ऐन दिवाळी व्यावसायिकांमध्ये चिंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.