मुंबई : यंदाच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू डीएचएल एक्स्प्रेसच्या ‘सिक्स फॉर ए कॉज’ मोहिमेला देखील पाठिंबा देतील, जी सलग तिसऱ्या वर्षी राबवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी डीएचल एक्स्प्रेस आर्थिकृदष्ट्या व सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमींमधील सहा मुलींच्या शिक्षणाला प्रायोजकत्व करेल.
डीएचएल एक्स्प्रेसने मुलींच्या शिक्षणासाठी स्माइल फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. (Mumbai Indians players will support DHL Express campaign mumbai news)
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
डीएचएल एक्स्प्रेसचे दक्षिण आशियामधील वरिष्ठ उपाध्यक्ष आर. एस. सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘डीएचएलसाठी मुंबई इंडियन्ससोबत आमचा सहयोग अद्वितीय आहे, जेथे आमचा हा एकमेव क्रिकेट सहयोग आहे.
आमचा विश्वास आहे की, हा सहयोग तरुण भारतीयांच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यामध्ये आम्ही बजावत असलेल्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करतो. क्रीडा क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र, आम्ही तुम्हाला यशस्वी होण्याकरिता पाठिंबा देतो.
आम्हाला ‘टीम बीहाइण्ड द टीम’ असण्याचा अर्थ माहीत आहे. मुंबई इंडियन्स जर्सीच्या मागील बाजूस गडद पिवळ्या रंगामधील डीएचएल लोगो याची आठवण करून देतो.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.