Nashik Onion News : उद्यापासून मुंगसे कांदा बाजार सुरु होणार; उन्हाळी कांद्याची आवक वाढणार

Onion
Onionesakal
Updated on

Nashik Onion News : येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारातील कांदा लिलाव दिवाळीच्या सुटीनंतर तब्बल तेरा दिवसांनी मंगळवारी (ता. २१) सुरु होणार आहे.

दिवाळी सुटीनंतर बाजारात उन्हाळी व लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढू शकेल. मजूर गावी गेल्याने दिवाळी सुटीत बाजार बंद ठेवण्यात आला होता.(Mungse onion market will start from tomorrow nashik news)

तालुक्यासह कसमादेत शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा शिल्लक आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये मिळेल त्या भावात कांदा विक्री केली. बदललेल्या हवामानामुळे चाळीमध्ये कांदा सडल्याने शेतकऱ्यांनी अत्यंत कमी किमतीत मालाची विक्री केली. महिन्यापासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. दिवाळीपूर्वी मुंगसे बाजारात सलग आठ दिवस उन्हाळी व नवीन लाल कांद्याची लक्षणीय आवक होती.

७ नोव्हेंबरला ८४० ट्रॅक्टर व ६५६ पिकअप असे एकूण १ हजार ४९६ वाहनातून उन्हाळी तर अडीचशे वाहनातून नवीन लाल कांदा विक्रीसाठी आला होता. सुट्यांपुर्वी उन्हाळी कांद्याला (सुपर) कमीत कमी ३ हजार ४००, जास्तीत जास्त ३ हजार ९३० तर सरासरी ३ हजार ६०० रुपये भाव होता. नवीन लाल कांद्याला कमीत कमी १ हजार ७००, जास्तीत जास्त ३ हजार ७१५ तर सरासरी ३ हजार ३५० रुपये भाव होता.

मध्यम प्रतीचा कांदा मात्र दोन ते अडीच हजार क्विंटलने विकला जात आहे. दिवाळी सुटीमध्ये बाजार बंद असताना शेतकऱ्यांनी नवीन लाल कांदा काढून ठेवला होता. उन्हाळी व नवीन लाल अशा दोन्ही कांद्यांची आवक वाढणार आहे. पहिल्याच दिवशी २० हजार क्विंटलपेक्षा अधिक कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. बाजार सुरु होत असल्याने मजुरांसह ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनचालकांना रोजगार मिळणार आहे.

Onion
Nashik Onion News: निर्यातशुल्क रद्द करूनही कांद्याला भाव नाही; केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नाराजीचा सूर

यावर्षी कमी पावसामुळे पावसाळी लाल कांद्याचे उत्पादन घटले आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी मका, बाजरी, कपाशी ही पिके अर्ध्यावर काढून टाकत कांदा लागवड केली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत कांदा बाजारात येईल. शेततळे व विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. आगामी उन्हाळी कांदा लागवडीचे भवितव्य देखील पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता

कसमादेत कांदा हे प्रमुख पीक झाले आहे. कांदा काढणी, नवीन लागवड आदींसाठी मजुरांना पुरेसे काम मिळत आहे. परिसरातील धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन मिळाले तर उन्हाळी कांद्याची लागवड देखील वाढू शकेल. यातून मजुरांचा भविष्यातील कामाचा प्रश्‍नही काही प्रमाणात सुटू शकेल.

तालुक्यासह कसमादेत काही ठिकाणी विहिरींनी आत्ताच तळ गाठला आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याचे पीक घेणे शक्य होणार आहे. उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटल्यास आगामी काळात कांद्याचे बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता आहे.

Onion
Nashik Onion News: कांदाप्रश्नी केंद्रीय समितीचे ‘वरातीमागून घोडे’; ग्राहकहितासाठी आता कळवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.