Nashik News : स्वच्छतेची संकल्पना झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोचावी या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ, सुंदर झोपडपट्टी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १५९ घोषित झोपडपट्ट्यांमध्ये १५ मेपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. (Municipal Commissioner decided to implement clean beautiful slum campaign under Swachh Bharat Mission nashik news)
स्वच्छता राबविलेल्या पहिल्या तीन स्वच्छ झोपडपट्ट्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीदेखील महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात स्वच्छ, सुंदर झोपडपट्टी अभियान राबविले जाणार आहे.
झोपडपट्ट्यांमध्ये राबविल्या जाणाऱ्या या अभियानात झोपडपट्टीवासीयांना स्वच्छतेची सवय लावण्याचा भाग आहे. अभियानात घोषित झोपडपट्ट्यांमधील मूलभूत सेवा- सुविधांचा आढावा घेणे, स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे.
ओला व सुका कचरा विलगीकरण, सांडपाणी भूमिगत गटारीद्वारे सोडणे या बाबी ध्यानात घेतल्या जाणार आहे. अहवाल प्राप्तीनंतर स्वच्छ झोपडपट्टी पुरस्कार दिला जाणार आहे. त्याअनुषंगाने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार झोपडपट्टी सर्वेक्षणासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
इंदिरा गांधी झोपडपट्टीला भेट
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नाव येण्यासाठी नाशिक महापालिकेने स्वच्छता अभियान सुरू केले आहे. लेखानगर येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक दोन झोपडपट्टीला आयुक्तांनी भेट दिली. मूलभूत सेवा- सुविधा, सुलभ शौचालये, परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली.
महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल नागरिकांशी संवाद साधला. परिसरात स्वच्छता कायमस्वरूपी ठेवण्याच्या सूचना दिल्या. घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.