NMC News : शहरात अपघातांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत ३३३ गतिरोधक तसेच अपघातांचे २६ ब्लॅक स्पॉटवर सुविधा पुरविल्या जाणार आहे. शासनाने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाला देवू केलेला एक टक्का निधी मिळविण्यासाठी महापालिकेने परिवहन विभागाकडे धाव घेतली आहे.
(Municipal Corporation approached Transport Department to get one percent of funds nashik news)
गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावर हॉटेल मिरची चौकात अपघात झाला. अपघातात बारा प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून अपघातप्रवण क्षेत्रात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतूक सुरक्षा समितीची बैठक झाली. त्यात अपघातांच्या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणात शहरात २६ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले, तर त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ३३३ ठिकाणी गतिरोधक टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उपाययोजना सुचविण्यासाठी रेझिलिएन्ट इंडिया कंपनी नियुक्त करण्यात आली. कंपनीमार्फत ४५ दिवसांच्या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर केला.
यात गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मोप्लास्टिक पेंटने पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर, हॅजार्ड मार्कर, सूचना फलक, नो- पार्किंग फलक लावणे या उपाययोजना सुचविण्यात आल्या. ३३३ ठिकाणी गतिरोधक, स्पीड टेबल तसेच झेब्रा क्रॉसिंग करणे, २६ ब्लॅक स्पॉटवर सिग्नल बसविण्याचे सुचविण्यात आले.
उपाययोजनांसाठी खर्चाचे अंदाजपत्रक महापालिकेमार्फत तयार करण्यात आले. राज्य शासनामार्फत जिल्हा नियोजन समितीला प्रादेशिक परिवहन विभागाकडे रस्ते सुरक्षेसाठी एक टक्का निधी दिला जातो. या निधीतून वाहतूक नियमांचे जनजागृती होते. तो निधी महापालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
असे आहेत विभागनिहाय गतिरोधक
विभाग गतिरोधक
पूर्व ६८
पश्चिम ३६
पंचवटी ८९
नाशिकरोड ४८
सिडको ६०
सातपूर ३२
एकूण ३३३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.